शिकारीच्या उद्देशाने जंगलात गावठीबाँम्ब पेरणाऱ्या आरोपींना आंबेगाव शासकीय वनात पडकले….!
*🛑शिकारीच्या उद्देशाने जंगलात गावठीबाँम्ब पेरणाऱ्या आरोपींना आंबेगाव शासकीय वनात पडकले….!*
*🛑सावंतवाडी वनपरीक्षेत्र व फिरते पथक यांची संयुक्त कारवाई*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-३१*:-शिकारीच्या उद्देशाने आंबेगाव येथील शासकीय वनात गावठी बॉम्ब पेरणाऱ्या तीन आरोपींना सावंतवाडी वन विभागाच्या टीमने आज सकाळी कारवाई करत ताब्यात घेतले.याचा सविस्तर वृत्तांत असा की, आंबेगाव येथील शासकीय वनात वारंवार आढळून येत असलेल्या वृक्षतोड व शिकार यांचेवर प्रतिबंध आणण्याच्या उद्देशाने काल रात्री घात लावून बसलेल्या वन विभागाच्या गस्ती पथकास आंबेगाव येथे असलेल्या वन सर्वे क्रमांक-81 मध्ये आज भल्या पहाटे तीन इसम, नामे -1)अबीर प्रकाश आंगचेकर रा. सांगेली (खालचीवाडी)-वय 30 वर्षे, 2)चंद्रकांत शंकर दळवी रा.आंबेगाव (म्हारकटेवाडी)-वय 50 वर्षे, 3)शांताराम गोपाळ राऊळ रा.सांगेली (टेंबकरवाडी)-वय 46 वर्षे गावठी बॉम्ब पेरताना आढळून आले. त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्यापैकी आरोपी क्रमांक-1 हा फरार होण्याच्या उद्देशाने पळू लागला. त्याचा पाठलाग करून वनविभागाच्या गस्ती पथकाने आरोपीला ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आरोपींनी बाळगलेले जिवंत गावठी बॉम्ब (नग-16) तसेच सोबत आणलेल्या दोन दुचाकी क्रमांक- 1)पल्सर MH 07 Z 8935 व हिरो डीलक्स MH 07 AF 1896 हे देखील जप्त करण्यात आले. आरोपींना अटक करून वन्यजीव संरक्षण अधिनियम-1972 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आज दुपारच्या दरम्यान आरोपींना सावंतवाडी येथील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
सदरची कारवाई ही उपवनसंरक्षक सावंतवाडी श्री. एस नवकिशोर रेड्डी तसेच सहाय्यक वनसंरक्षक डॉ. सुनिल लाड यांचे मार्गदर्शनाखाली सावंतवाडी वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर(अतिरिक्त कार्यभार फिरते पथक), वनरक्षक आंबेगाव दत्तात्रय शिंदे, वनरक्षक फिरतेपथक प्रमोद जगताप, वनरक्षक कोलगाव सागर भोजने, वनरक्षक इन्सुलि संग्राम पाटील यांच्या गस्ती पथकाने पार पाडली.
वन विभागाकडून सर्व सुजाण नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपल्या आजूबाजूला कुठे असे वनगुन्हे घडत असल्याचे आपल्या निदर्शनास त्यांना प्रतिबंध आणण्यासाठी कृपया आपण वन विभागाच्या नजीकच्या कर्मचारी किंवा कार्यलयास संपर्क साधावा तसेच आपली माहिती आपण 1926 या टोलफ्री क्रमांकावर देखील कळवू शकता असे आवाहन वनविभागाने केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_