कणकवलीकोकणमहाराष्ट्रसामाजिक

आर्थिक देवाण-घेवाणीतून जोरदार राडा

*🛑आर्थिक देवाण-घेवाणीतून जोरदार राडा*

*🛑कुडाळ-कणकवली तालुक्यातील दोन गावांतील तरुणांत वाद : पदाधिकाऱ्याच्या मध्यस्थीने वादावर पडदा*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली, दि-२९* :-महामार्गाच्या चौपदरीकरणानंतर सर्वपक्षीय राजकीय अड्डा म्हणून ओळख निर्माण झालेल्या शहरातील चौकात मंगळवारी हाणामारीचा प्रकार घडला. आर्थिक देवाण-घेवाणीतून घडलेल्या या प्रकारात कुडाळ तालुक्यातील एका गावातील काहींनी थेट कणकवली गाठली अन् शहरालगतच्या गावातील काहींसोबत वाद होऊन राडा झाला. यात काहींना ‘प्रसाद’ मिळाला मात्र, दोन्हींकडील कार्यकर्ते एकाच पक्षाचे असल्याने एका तालुकास्तरीय पदाधिकाऱ्याने मध्यस्थी करीत चौकातून त्यांना दुसरीकडे नेत या विषयावर पडदा टाकला. मात्र, सुमारे अर्धातास हे नाट्य रंगल्याने मोठी गर्दी झाली होती.याबाबतची माहिती अशी, कुडाळ तालुक्यातील एका धरणाच्या कामावर सुरक्षारक्षक म्हणून नोकरी लावण्यासाठी कणकवली तालुक्यातील या तरुणाने काही रक्कम ठरविली होती. संबंधित तरुण अशाप्रकारे ‘देवाण-घेवाणी’तून अशा नोकऱ्या लावत असल्याचे सांगण्यातं येते. विशेष म्हणजे कुडाळ तालुक्यातील त्या कार्यकर्त्याला नोकरीला लावल्यानंतर त्या बदल्यात ठरलेली रक्कम हा तरुण मागत होता. मात्र, त्याला प्रतिसाद मिळत नसल्याने गेले काही दिवस त्यांच्यात अंतर्गत धुसफुस सुरू होती.दरम्यान, मंगळवारी हा विषय मिटविण्याच्या अनुषंगाने कुडाळमधील त्या तरुणाला पाचारण करण्यात आले होते. यावेळी फोनवर दोघांमध्येही शाब्दिक बाचाबाची झाली होती. त्यामुळे कुडाळहून येणाऱ्या तरुणाने सोबत काहींना आणले होते. तर तालुक्यातील हा तरुणही काही मित्रमंडळींना सांगून तयारीत होता. एकत्रित बसून निर्णय होण्याअगोदरच त्या राजकीय चौकात हे समोरासमोर येत वांद रंगला. काही वेळातच वाद वाढत जाऊन एकमेकांना जोरदार धक्काबुक्की करत प्रसादही देण्यात आला. हे प्रकरण हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच तालुकास्तरीय एका पदाधिकाऱ्याने आक्रमक भूमिका घेत सर्वांना चौकातून उठवून दुसरीकडे नेले. तेथे ठराविक जणांनाच सोबत घेत, या वादावर पडदा टाकण्यात आला. मात्र, या साऱ्यातून अशाप्रकारे धरणांवर सुरक्षा रक्षकांची नियुक्ती नेमकी कुणाकडून होते, नियुक्तीसाठी मध्यस्थांकडून होणाऱ्या डिलिंगमध्ये अधिकारीही असतात का, या व अशा चर्चांना उत आला होता.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!