कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

सावंतवाडी तालुका सह. खरेदी विक्री संघामार्फत १४६६२ क्विंटल भाताची खरेदी

*🛑सावंतवाडी तालुका सह. खरेदी विक्री संघामार्फत १४६६२ क्विंटल भाताची खरेदी*

*🛑९९७ शेतकऱ्यांच्या ३ कोटी २० लाख ७ हजार २४६ बँक खात्यात जमा*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-२९*:-यंदाच्या हंगामामध्ये सावंतवाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघाने शासकीय आधारभूत किंमतीत ९९७ शेतकऱ्यांकडून सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील ९ केंद्राच्या माध्यमातून भात खरेदी करण्यात आली असून त्यापोटी शेतकऱ्यांना ३ कोटी २० लाख ७ हजार २४६ रूपये प्राप्त झाले असल्याची माहिती चेअरमन प्रमोद गावडे यांनी दिली.शासकिय आधारभूत किंमत भात खरेदी योजना सन २०२३-२४ अंतर्गत सावंतवाडी तालुका सह. खरेदी-विक्री संघाने सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यात ९ केंद्रामार्फत १०२२ शेतक-यांची नोंदणी केली होती. त्यापैकी ९९७ शेतक-यांकडील १४६६२ क्विंटल भाताची खरेदी केली असून, तालुक्यातील ९९७ शेतक-यांनी ३ कोटी २० लाख ०७ हजार १४६ रूपये भात विक्री रक्कमेचा लाभ घेतला आहे, असे त्यांनी सांगितले.सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील १०२२ शेतक-यांनी खरीप हंगाम २०२३-२४ मध्ये ई-पीक ची नोंद करुन भात खरेदीची नोंदणी केली होती. शासनाने प्रती हेक्टर २० हजार प्रमाणे दोन हेक्टर पर्यतच्या नोंदणीला प्रोत्साहनपर बोनस जाहीर केला होता. त्याप्रमाणे १०२२ शेतक-यांना रक्कम १ कोटी ४५ लाख ४९ हजार ६० रूपये शेतक-यांच्या सेव्हिंग खाती शासनाने बोनस रक्कम वर्ग केली आहे, अशी माहिती खरेदी-विक्री संघाचे चेअरमन श्री. प्रमोद गावडे यांनी दिली आहे.गावडे म्हणाले,शासकीय आधारभूत किंमतीत भात खरेदी करण्यासाठी ई पीक नोंदणी आवश्यक आहे. यंदा भात विक्री करण्यासाठी शेतकरी आले होते,पण त्यांनी ई पीक नोंदणी केली नव्हती त्यामुळे ते शासकीय हमीभाव किंमतीत भात विक्री पासून वंचित राहीले आहेत त्यामुळे यंदाच्या हंगामात ई पीक नोंदणी प्रत्येक शेतकऱ्याने केली पाहिजे. इ पीक नोंदणी केली तर शासनाने भात नुकसान भरपाईचा निर्णय घेतला तर शेतकरी वंचित राहणार नाहीत. शासकीय ई पीक नोंदणी आणि खरेदी विक्री संघाकडे नोंदणी महत्त्वाची आहे. त्याची भात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी नोंद घेऊन पावसाळ्यात ई पीक नोंदणी सक्तीने करावी.
यंदाच्या हंगामामध्ये शेतकऱ्यांना भात बियाणे,खत, किटकनाशके खरेदी विक्री संघाने उपलब्ध करून दिली आहेत. खरेदी विक्री संघाने स्वतः सह मागणी केलेल्या विकास संस्था, ग्रामपंचायत आणि कृषी केंद्रांना खत उपलब्ध करून दिले आहे असे प्रमोद गावडे म्हणाले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!