आमदार वैभव नाईकांकडून अधिकाऱ्यांना खडेबोल
*🛑 आमदार वैभव नाईकांकडून अधिकाऱ्यांना खडेबोल*
*🛑 लोकांची कामे वेळेत पूर्ण करा! : नागरिकांच्या कामांबाबत कुडाळ तहसील कार्यालयात आढावा : अधिकारी धारेवर*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि-२८*:-कुडाळ तालुक्यातील नागरिकांच्या शासकीय कामांसंदर्भातील प्रश्नांबाबत व समस्यांबाबत आमदार वैभव नाईक यांनी सोमवारी येथील तहसीलदार कार्यालयात भेट देत नागरिकांच्या कामांबाबत आढावा घेतला.शासकीय दाखले, विद्यार्थ्यांचे प्रवेश दाखले, रेशनकार्ड, इतर नोंदी, वारस तपास नोंदी आदीसंदर्भात प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे व तहसीलदार वीरसिंग वसावे यांच्याशी चर्चा केली. आमदार नाईक यांनी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारत धारेवर धरले. काही नागरिकांच्या समस्या तात्काळ मार्गी लावण्यात आल्या. महसूलची अनेक कामे रेंगाळल्याने नाईक यांनी तहसीलदारांना खडेबोल सुनावले. कुडाळचे उपनगराध्यक्ष किरण शिंदे, नगरसेवक संतोष शिरसाट, अतुल बंगे, शिवसेना ठाकरे गट तालुका संघटक बबन बोभाटे, उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, नगरसेवक उदय मांजरेकर, गंगाराम सडवेलकर, शेखर गावडे आदी उपस्थित होते. – नागरिकांनी आमदार नाईक यांच्यासमोर आपल्या कामांचा पाढा वाचला. प्रशासन अधिकारी आमच्या कामांबाबत टाळाटाळ करीत आहेत, असा आरोप नागरिकांनी केला. तेव्हा नाईक यांनी संबंधित प्रत्येक अधिकाऱ्याला धारेवर धरले. आज काही लोकांची रेशनकार्ड यादीमध्ये नावे असूनही त्यांना अजूनही धान्य मिळत नाही. तेव्हा नाईक यांनी पुरवठा शाखेच्या अधिकाऱ्यांना जाब विचारत धारेवर धरले. कुंदे गावातील काही लोक रेशन धान्यापासून अजूनही वंचित आहेत, असे तेथील ग्रामस्थांनी सांगितले. याबाबत लवकरच दखल घेतली जाईल, असे नाईक यांनी सांगितले. यापूर्वी रेशनकार्डवर नाव चढविण्याचा अधिकार तलाठ्यांना होता. आता लोकांना याठिकाणी यावे लागत आहे. त्यांना याठिकाणी सतत ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो, असे अतुल बंगे यांनी सांगून नाराजी व्यक्त केली. लोकांना मदत करणे हे प्रशासन अधिकाऱ्यांचे काम आहे, असे बबन बोभाटे यांनी सांगितले. तुळसुली गावात आज तलाठी नाही. त्या ठिकाणी पावशी येथील प्रभारी तलाठी तेथील कार्यभार सांभाळत आहेत. त्यांना संपर्क केल्यास ते तलाठी आपल्याला उडवाउडवीची उत्तरे देतात. तुमचे दूरध्वनी उचलायला आपण बांधील नाही, असे सांगतात, असे तेथील लोकांनी सांगितले. यावर तलाठ्यांना एक दिवस बोलावून घ्या. त्यांची बैठक घ्या, असे नाईक याँगी तहसीलदार वसावे यांना सांगितले. आज लोकांना मराठा समाजाचे दाखले मिळत नाहीत. मराठा समाज दाखल्याची साईट बंद आहे, असे प्रशासनाकडून वारंवार सांगितले जाते, असे लोकांनी सांगितले, तेव्हा नाईक यांनी दूरध्वनीवरुन वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच लोकांचे अर्ज मागवून घेतले. प्रत्येकाच्या कामाबाबत प्रांताधिकारी काळुशे व तहसीलदार वसावे यांच्यासमोर कामाची चौकशी केली. कुंदे रस्त्याच्या अडचणीबाबत तेथील लोकांनी सांगितले. त्या रस्त्याचे काय झाले?, असा सवाल नाईक यांनी केला. सरपंचांना बोलावून उद्याच बैठक घ्या, असे तहसीलदारांना सांगितले. नेरुरला कायमस्वरुपी तलाठी नाही. तेथे पर्यायी तलाठी द्या, अशी मागणी तेथील ग्रामस्थांनी केली. त्यावर नाईक यांनी उद्यापासून तेथे तलाठी हजर राहिला पाहिजे, अशी सूचना केली. प्रांताधिकाऱ्यांनी उद्यापासून त्या ठिकाणी तलाठी हजर राहील, अशी ग्वाही दिली.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

