दारू व्यावसायिकांना ‘अभय’? महिलांना वाटतोय ‘भय’
*🛑दारू व्यावसायिकांना ‘अभय’? महिलांना वाटतोय ‘भय’*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴दोडामार्ग, दि-२८*:-साटेली-भेडशी येथील बाजारपेठेत कोणाताही मुलाहिजा न बाळगता पोलिसांच्या नाकावर टिच्चून दारू विक्री होत असल्याचे हे उदाहरण समोर येत आहे. कोणाचे वडील, कोणाचा पती, कोणाचा भाऊ याची अशी दुर्दशा उघड्या डोळ्यांनी पहायची वेळ आली आहे. हीच का ती दारुबंदी? असा सवाल व्यक्त होत आहे. एका वाचकाकडून दारुबंदी किती गरजेची हे दाखविण्यासाठी सोमवारी सकाळी मोबाईलमध्ये कैद केलेले दृष्य ‘तरुण भारत संवाद’ला पाठवले. पोलीस किंवा राज्य उत्पादन शुल्क दखल घेऊन येथील माय भगिनींना – उज्ज्वल पहाट देतील काय? असा सवाल निर्माण होत आहे.’तरुण भारत संवाद’ने साटेली- भेडशी येथील निघृण खून प्रकरणानंतर येथील दारुबंदी किती आवश्यक आहे, यावर प्रकाशझोत टाकला होता. त्यानंतर अनेक ग्रामस्थ, महिला यांनी ‘तरुण भारत संवाद’ आया बहिणीचा आवाज बनल्याचे सांगितले. पोलीस दक्ष झाले. तातडीने या परिसरातील दारू अड्ड्यांचे पुढील दरवाजे बंद झाले. मात्र, पोलिसांना गुंगारा देण्यांचे काम सुरू असून जोपर्यंत राज्य उत्पादन शुल्क कडक पाऊले उचलत नाहीत, तोपर्यंत चोरी छुपे दारुविक्री सुरू राहील. काही महिलांनी तर अश्रू ढाळले. काहीही करा, पण दारू धंदे बंद करा. आम्ही बाहेर आलो तर दबाव आणला जातोय. पण, ‘तरुण भारत संवाद’ हा आमचाच आवाज आहे, असे त्या व्यक्त झाल्या.साटेली-भेडशी बाजारपेठेतील अवैध दारू विक्री हा विषय आता केवळ बाजारपेठेपुरता मर्यादीत राहिला नाही तर दशक्रोशीत हा विषय चर्चेत ठरत असून गावागावातून युवक महिला एकत्र येऊन संबंधित अधिकारी यांची भेट घेणार आहेत. तत्पूर्वी एक संघटना स्थापन केली जाणार आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

