आणखीशैक्षणिक

दिव्याज्योती डेगवे प्रशालेचा दहावीचा निकाल 100%

दिव्याज्योती प्रशाळेचा दहावीचा निकाल 100%

 

बांदा:प्रतिनिधी:शैलेश गवस

येथील दिव्य ज्योती स्कूल डेगवे प्रशाळेचा दहावीचा माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा 2024 चा 100% निकाल लागला.सलग चौथ्या वर्षी प्रशाळेने 100% निकालाची परंपरा कायम राखली. परीक्षेसाठी एकूण 24 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते,पैकी 23 विद्यार्थी विशेष योग्यता श्रेणित तर एक विद्यार्थी प्रथम श्रेणित उत्तीर्ण झाला.

कु.उद्धव गोपाळ परब याने 92%गुण मिळवत प्रशाळेतून प्रथम येण्याचा मान मिळवला तर कु.अर्जुन प्रवीण कोरगावकर याने 91%मिळवत द्वितीय तर कु.चिराग संजय पाटील याने 90.80%गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला, आलिया अब्दुल मझीद खान हिने 90.20% गुण मिळवत चौथ्या क्रमांकाने यश मिळवले.

प्रशाळेचे मुख्याध्यापक फादर बॅनेट, उपमुख्याध्यापक फादर रॉबिन,शिक्षक पालक समिती अध्यक्षा सौ. रूपा शिरसाट,सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी, पालक यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!