कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

नव्या रस्त्यावर मान्सूनपूर्व पावसातच साचले पाणी

*🛑नव्या रस्त्यावर मान्सूनपूर्व पावसातच साचले पाणी*

*🛑सावंतवाडी शहरातील भोसले उद्यानजवळील रस्ता होणार खड्डेमय*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴ओटवणे, दि-२७*:-सावंतवाडी नगरपालिकेने शहरातील बऱ्याचशा रस्त्यांचे डांबरीकरणाचे काम हाती घेत पावसाळ्यापूर्वी रस्ते खड्डेमुक्त करून उल्लेखनीय काम केले आहे. याचवेळी गेल्या दहा वर्षांपूर्वी डांबरीकरण झालेला व अनेक वर्षे खड्डेमय असलेला जन. जगन्नाथराव भोसले उद्यानच्या शेजारील रस्ता डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आले. परंतु सदर रस्त्याचे काम करताना जुन्या रस्त्यावर असलेले खड्डे व जिथे पाणी साचायचे अशा सखल भागाकडे ठेकेदार व नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने नव्याने केलेल्या रस्त्यावर जागोजागी मान्सूनपूर्व पावसातच डबकी साचत असून जनतेचा पैसा पाण्यात गेला असल्याचे दिसत आहे.सदरचे काम सुरू असताना त्यावेळीच परिसरातील नागरिकांनी पाणी साचत असलेल्या भागांची माहिती देत खड्ड्यांमध्ये जास्त खडी घालून रस्त्याची उंची वाढविण्याबाबत ठेकेदाराला सूचना केली होती. परंतु काम सुरू करताना आलेला ठेकेदार काम पूर्ण झाले तरी फिरकलेला दिसला नाही आणि नगरपालिकेच्या बांधकाम विभागाने देखील अनेक वर्षे रखडलेला, उपोषणे, आंदोलने झालेला रस्ता असताना देखील दुर्लक्ष केल्याने रस्त्याचे काम सुमार दर्जाचे होऊन रस्त्यावर जागोजागी डबकी पडून पाणी साचत आहे. सदरच्या रस्त्यावरून केवळ सालईवाडा परिसरातील नागरिक जात नसून मिलाग्रिस शाळेच्या कितीतरी मुलांची वर्दळ असते. मान्सूनपूर्व पावसातच डबकी पडल्याने येणाऱ्या पावसाळ्यात पुन्हा रस्ता उखडून खड्डेमय होण्याची शक्यता असल्याने जनतेच्या पैशाचा अपव्यय झाला आहे. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने सदर सदोष कामाची दखल घ्यावी, अशी मागणी सालईवाडा प्रभागातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!