मालवणात वाळू माफियांची मुजोरी सुरूच
*🛑मालवणात वाळू माफियांची मुजोरी सुरूच*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मालवण, दि-२७*:-शासकीय सुट्ट्यांच्या दिवशी मालवण-कोळंब मार्गावर मोठ्या संख्येने रात्रीच्यावेळी वाळूने भरलेल्या डंपरची वाहतूक जोरात सुरू असते. दोनवेळा अपघात झाल्यानंतर डंपर चालकांच्या वेगावर ग्रामस्थांनी योग्यप्रकारे मर्यादा घातल्या होत्या. मात्र, डंपरमधून पडणाऱ्या वाळूमुळे अपघाताची शक्यता असल्याने रस्त्यावर पडलेली वाळू हटविण्याचे सौजन्यही वाळू माफियांकडून दाखविण्यात येत नसल्याबद्दल कोळंब ग्रामस्थ पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता आहे. शनिवारी रात्री सुरू असलेल्या वाहतुकीमुळे कोळंबच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाळू रस्त्यावर पडून दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, यापूर्वी अशाचप्रकारे वाळू रस्त्यावर पडल्याने अनेक अपघात झाले होते. दुचाकीस्वारांना गंभीर दुखापती झाल्या होत्या.यामुळे वाळू व्यावसायिकांची मुजोरी पुन्हा वाढू लागली असल्याचे चित्र आहे. मालवण-कोळंब या सागरी महामार्गावर रात्रीच्यावेळी नियमितपणे ७० ते ७५ डंपर धावतात. रात्री नऊ ते पहाटे पाचपर्यंत चालणाऱ्या या वाहतुकीला यंत्रणांचा आशीर्वाद असल्यानेच ही वाहतूक सुरू असल्याचे आता खुलेआम बोलले जात आहे. याकडे आता सर्वसामान्य दुर्लक्ष करत आहेत मात्र रस्त्यावर पडलेली वाळू डंपर चालकांना आणि त्यांच्या मालकांनाही दिसली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.कोळंब येथील रस्त्यांवर झालेल्या अपघातांमुळे अनेक ठिकाणी गतिरोधक बसविण्यात आले आहेत. त्यामुळे डंपरमधील वाळू कमी जास्त प्रमाणात रस्त्यावर पडते. मात्र, एका डंपरमधील वाळू खाली पडली, तर त्याच्या पाठून येणाऱ्या दुसऱ्या डंपर चालकाने याची कल्पना संबंधितांना देऊन रात्रीच्यावेळी वाळू रस्त्यावरून हटविणे आवश्यक असते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने आज पहाटे कोळंब येथे दुचाकी घसरून किरकोळ अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

