उबाठाच्या प्रचाराला पवार, राऊत का आले नाहीत?
*🛑उबाठाच्या प्रचाराला पवार, राऊत का आले नाहीत?*
*🛑आमदार नीतेश राणे यांचा सवाल : विजयी गुलाल आम्हीच उधळणार!*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि-२४*:-विनायक राऊत यांच्या प्रचाराला संजय राऊत का आले नाहीत? उबाठा शिवसेनेमध्ये एकमेकांचे पाय ओढले जातात, भाजपमध्ये नाही. काँग्रेस नेते, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते किंवा स्वतः शरद पवार प्रचाराला का आले नाहीत? त्यामुळे विजय हा भाजपचाच होणार आणि नारायण राणे विजयी होणार व विजयाचा गुलाल आम्हीच उधळणार, अशा शब्दांत आमदार नीतेश राणे यांनी विश्वास व्यक्त केला. त्यांनी महाविकास आघाडी आणि उबाठाचे भास्कर जाधव यांच्या गौप्यस्फोटावरही टीका केली.येथील ओम गणेश निवासस्थानी पत्रकारांशी राणे बोलत होते. ‘भाजपच्या बड्या नेत्याने विनायक राऊत यांना निवडणुकीत ५० कोटी दिल्याच्या’ शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी केलेल्या गौप्यस्फोटाला प्रत्युत्तर देताना नीतेश राणे म्हणाले, विनायक राऊत यांचा पराभव समोर असल्यानेच भास्कर जाधव असे आरोप करत आहेत. ‘पुणे हिट अँड रन’ प्रकरणांत शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे गप्प का? शरद पवार गटाकडून या प्रकरणात कोणती प्रतिक्रिया का येत नाही? अगरवाल आणि पवार कुटुंब यांचे काय संबंध आहेत काय? आरोपीला दिलेला वकील पवार कुटुंबियांच्या घनिष्ट संबंधातील असल्याची माहिती मिळते आहे. म्हणजे अगरवाल याला वाचविण्याचा प्रयत्न होतो आहे का? त्यामुळे एरव्ही सर्व प्रकरणी आवाज उठविणाऱ्या आणि राजीनामे मागत फिरणाऱ्या सुप्रिया सुळे यांनी याबाबत व्यक्ते व्हावे, असे सांगतानाच आशिष शेलार यांची तक्रार योग्य आहे. ४ जूनला एनडीएचा मोठा विजय होणार असल्याचे आमदार नीतेश राणे यांनी सांगितले. निवडणूक आयोगामुळे मतदान कमी झाल्याची टीका जितेंद्र आव्हाड करत आहेत, हेही हास्यास्पद आहे. मुंबऱ्यात बोगस मतदान होते, याकडे आव्हाड यांनी पाहवे. रोहिंग्या आणि बांग्लादेशी लोक किती प्रमाणात मतदान करतात आणि हे बोगस मतदान कोण करून घेतो, त्यावर आव्हाड यांनी बोलावे. राजकीय जाणकार, जे भाजपच्या २५० किंवा ३०० या संभाव्य आकडेवारीवर भाष्य करताहेत, त्यांना ४ जूनलाच मतपेटीतून उत्तर मिळेल. अशीच आकडेवारी २०१४ व २०१९ मध्येही सांगितली जात होती. मात्र, जनता ही नरेंद्र मोदी यांच्या पाठिशी आहे व कायम राहील हे मतपेटीतून दिसून येईल, असेही राणे म्हणाले. मनोज जरांगे-पाटील यांच्या ६ जून रोजीच्या आंदोलनाच्या इशाऱ्यावर बोलताना आमदार राणे म्हणाले, काहीही झाले, तरी मराठा आरक्षण महायुती सरकार देणारच आहे. कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण दिले जाणार आहे. लोकशाहीत आंदोलनाचा हक्क प्रत्येकाला आहे. त्यांनी ते करावे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

