कुडाळकोकणमहाराष्ट्रसामाजिक

कविलकाटे येथील रमेश परशुराम जळवी यांच्या राहत्या घरावर भली मोठी दोन झाडे पडल्याने १लाख २० हजाराचे नुकसान..

*🛑कविलकाटे येथील रमेश परशुराम जळवी यांच्या राहत्या घरावर भली मोठी दोन झाडे पडल्याने १लाख २० हजाराचे नुकसान..*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कुडाळ, दि-२४*:-काल गुरुवारी २३ मे.रोजी रात्री जोरदार पडलेला पाऊस सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकटासह पाऊस पडला यात बऱ्याच ठिकाणचे विजेचे पोल,विजवाहिन्या,झाडे जमिनीवर कोसळून पडली आहेत.त्यामुळे कविलकाटे सह कुडाळ शहरातील काही भागात लाईट गेली आहे.त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.कुडाळ शहरातील कविलकाटे येथील श्री.रमेश परशुराम जळवी यांच्या राहत्या घरावर काल रात्री ८.३० वाजता भेलड्या माड चे झाड आणि रतांबी (कोकम) झाड पडल्याने रमेश जळवी यांचे मोठे नुकसान झाले आहे.घरावर दोन झाडे पडून सुमारे १ लाख २० हजाराचे नुकसान झाले आहे.काल रात्री झालेला जोरदार वारा आणि पाऊस यामुळे मोठा आवाज येत रमेश जळवी त्यांच्या घरावर दोन झाडे कोसळली लगेच घाबरून घरातील सर्व माणसे ,लहान मुले यांनी घराचा मागील बाजूने घराबाहेर निघून गेली.त्यामुळे त्यांच्यावर सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.अचानक आलेला वारा,पाऊस यामुळे त्यांच्या घरावरील पत्र्याचे छप्पर आणि कौलारू छप्पर कोसळून यांचे नुकसान झाले आहे.अचानक घरावर झाडे कोसळल्याने घरातील लहान मुले,महिला घाबरून गेली.आज सकाळपासून त्यांनी त्यांच्या घरावर पडलेली दोन्ही झाडे कोयता, करवतीच्या सहाय्य|ने तोडून बाजूला केली आहेत.अचानक आलेल्या वारा पाऊस यामुळे जळवी कुटुंबावर हा प्रसंग ओढवला आहे.त्यांच्या घरावर झाडे पडल्यामुळे नुकसान झाले आहे आम्हाला लवकरात – लवकर ही नुकसान भरपाई मिळावी असे जळवी कुटुंबियांकडून सांगण्यात येत आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!