डॉक्टरनी उद्धट वागणूक दिल्याची रुग्णाची तक्रार
*🛑डॉक्टरनी उद्धट वागणूक दिल्याची रुग्णाची तक्रार*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴आंबोली, दि-२३*:-आपला अपघात होऊनसुद्धा आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ. आदिती पाटकर यांनी आपल्यावर योग्य उपचार न करता आपण ज्यावेळी त्यांच्याकडे मेडिकल सर्टिफिकेट मागण्यासाठी गेलो असता ‘मी काय तुम्हाला घरी बसायला सांगितले काय? मी काही मेडिकल सर्टिफिकेट देणार नाही’, असे उद्धट उत्तर देत हाकलून लावले. त्यामुळे त्यांची चौकशी करून कारवाई करावी. अन्यथा न्याय मिळेपर्यंत उपोषण छेडण्याचा इशारा सिंधुदुर्ग जिल्हा बँक कर्मचारी संजय काशिनाथ भिसे यांनी दिला आहे.त्यांनी पत्रकात म्हटले आहे की, आपल्या मोटारसायकलचा २८ एप्रिलला अपघात झाला होता. हा अपघात आंबोली पोलीस दूरक्षेत्राच्या कक्षेत झाल्याने मला प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी पाठविण्यात आले. मी ज्यावेळी केंद्रात आलो त्यावेळी डॉ. आदिती पाटकर होत्या. त्यांनी माझी चौकशी केली. कोठे लागले विचारले आणि योग्य उपचार न करताच मला पाठवून दिले. शेवटी मला कामावर जाताना मेडिकल सर्टिफिकेटची गरज भासली. त्यावेळी आपण पुन्हा त्यांच्याकडे गेलो असता मी तुम्हाला बसायला सांगितले नव्हते. मी सर्टिफिकेट देऊ शकत नाही, असे सांगितले. असा प्रकार माझ्यासोबतच घडलेला नसून अन्य लोकांनाही असा अनुभव आलेला आहे. आपली तक्रार वरिष्ठांपर्यंत पोहोचवून मला ‘न्याय न मिळाल्यास उपोषण करणार आहे. याबाबत डॉ. पाटकर यांच्याशी संपर्क साधला असता असा प्रकार घडलेला नाही. आपण नियमाप्रमाणे चार दिवसाचे मेडिकल सर्टिफिकेट देऊ शकते. एक महिन्याचे नाही. ज्या डॉक्टरांकडून पुढील उपचार घेतले असतील त्यांच्याकडून सर्टिफिकेट घ्या, असे आपण सांगितले. अन्य रुग्णांना जशी सेवा देते, तशीच सेवा भिसे यांना दिली, असे त्यांनी स्पष्ट केले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

