२५ हून अधिक वीजखांबांची पडझड
*🛑 २५ हून अधिक वीजखांबांची पडझड*
*🛑 बांद्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस : गडगेवाडीत पिंपळाचे झाड घरावर कोसळले*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴बांदा, दि-२३*:बुधवारी सायंकाळी बांदा परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या अवकाळी पावसाने हाहाकार माजवला. शहरासह ग्रामीण भागात ठिकठिकाणी रस्त्यावर, वीज वाहिन्यांवर झाडे उन्मळून पडल्याने लाखो रुपयांची हानी झाली. शहरातील गडगेवाडी येथील भाजपचे पदाधिकारी ज्ञानेश्वर सावंत यांच्या घरावर पिंपळाचे झाड कोसळल्याने मोठे नुकसान झाले. २५ हून अधिक विद्युत खांब उन्मळून पडल्याने बांदा शहरासह पाच गावे अंधारात बुडाली आहेत. ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांवर झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. बुधवारी सायंकाळी विजांच्या गडगडाटासह तब्बल दोन तास मुसळधार पावसाने शहर व परिसराला झोडपून काढले. बहुतांश ठिकाणी वीज कोसळल्याने वीज उपकरणे निकामी झालीत. वादळी पावसाचा सर्वाधिक फटका बांदा शहराला बसला. शहरातील ज्ञानेश्वर सावंत यांच्या घरावर पिंपळाचे भलेमोठे झाड पडल्याने सावंत यांचे २५ लाख रुपयाहून अधिक नुकसान झाले. घराचे लाकडी छप्पर, कौले, घरातील सामानाचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने सावंत हे कुटुंबियांसह घराच्या बाहेर असल्याने बचावलेत. सुदैवाने घरात असलेली त्यांची वृद्ध आई पाऊस सुरू असल्याने मागच्या बाजूला होती तर पुतण्या पुढे बसला होता. मात्र, सुदैवाने त्याला कोणतीही दुखापत झाली नाही. घराच्या अंगणात असलेली दुचाकी व अॅम्ब्युलन्सचे देखील नुकसान झाले. बांदा ग्रामस्थांनी पाऊस ओसरताच कोणत्याही शासकीय यंत्रणेची वाट न पाहता मदत कार्य सुरू केले. बांदा सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य घटनास्थळी उपस्थित होते. बांदा शहरातील ग्रामस्थांनी घरावर कोसळलेला महाकाय वृक्ष कटरच्या साहित्याने बाजूला केला. मात्र, सावंत यांचे मोठे नुकसान झाले असून घराच्या भिंती मातीच्या असल्याने काही प्रमाणात कोसळले. तर घरातील घरगुती सामान, टीव्हीसह इतर उपकरणांचे मोठे नुकसान झाले.बांदा शहरातील विराज देसाई (गवळीटेम्ब) यांच्या घराचे पत्रे उडून १० हजार रुपये, शंकर आगलावे यांच्या घराच्या छपराचे १५ हजार रुपये, उर्मीला उरुमकर यांच्या घरावर काजूचे झाड कोसळून नुकसान झाले. संजय धुरी व फय्याज खतीब यांच्या घरावर वीज कोसळून वायरिंग जळाल्याने नुकसान झाले.इन्सुली येथे जुन्या मुंबई गोवा महामार्गावर रस्त्यावर झाडे उन्मळून पडली. बांदा दोडामार्ग रस्त्यावर पानवळ येथे रस्त्यावर झाडे पडल्याने रस्ता वाहतुकीस बंद होता. नेतर्डे, शेर्ले, डेगवे, वाफोली येथे देखील अनेक घरांचे वादळी पावसाने नुकसान झाले. बांदा शहर व पारिसरात २५ हून अधिक वीज खांब कोसळले. तसेच वीज वाहक तारांवर झाडे पडल्याने महावितरणचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.मुख्य वीज वाहिनीत बिघाड निर्माण झाल्याने तसेच बांदा फिडरमधील वीज खांब पडल्याने शहरातील तसेच ग्रामीण भागातील वीजपुरवठा खंडित झाला. सहाय्यक अभियंता एस. आर. कोहळे यांनी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू केले असून महावितरणची ज्यादाची कुमक मागविण्यात आली आहे.
*मोबाईल सेवा विस्कळीत*
वीज गुल झाल्याने शहरातील मोबाईलची सेवा देखील विस्कळीत झाली आहे. बांदा तलाठी फिरोज खान हे नुकसानीचा पंचनामा करत आहेत. ठिकठिकाणी रस्त्यावर कोसळलेली झाडे बाजूला करण्यासाठी स्थानिकांनी पुढाकार घेतला आहे. बांदा सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच बाळू सावंत यांच्यासंह ग्रामपंचायत सदस्य नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

