कुडाळ शहरात दोघा बिल्डरांकडून नाल्यावर अतिक्रमण
*🛑 कुडाळ शहरात दोघा बिल्डरांकडून नाल्यावर अतिक्रमण*
*🛑 मनसे जिल्हा उपाध्यक्षांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन :बांधकाम हटवून कारवाईची मागणी : अन्यथा आंदोलन करणार!*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि-२२*:-कुडाळ शहरातील संत राऊळ महाराज कॉलेज सर्कल येथील हॉटेल गजालीला लागून असणाऱ्या व पावसाळ्यात साचणारे पाणी निचरा होणाऱ्या नाल्यावर दोघा खासगी बिल्डर्सनी त्या नाल्याची लांबी-रुंदी बदलून भराव टांकून चुकीच्या पद्धतीने काँक्रिट बांधकाम केले आहे. हे. बांधकाम हटविण्याबाबत कार्यवाही व्हावी. तसेच त्या बिल्डर्सवर कडक कारवाई करावी, अशी मागणी मनसे जिल्हा उपाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी कुडाळ न. पं.चे मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात त्या ठिकाणी चौकात साचणाऱ्या पाण्यात आंदोलन केले जाईल, असा इशाराही त्यांनी मनसेच्यावतीने दिला आहे.येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयासमोर नाला असून मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळला की, पाणी त्या चौकात साचते. त्यामुळे पादचारी नागरिक, विद्यार्थी, तेथील व्यावसायिक, वाहनधारक यांना त्रास सहन करावा लागतो. याच नाल्यावर खासगी बिल्डर्सनी चुकीच्या पद्धतीने काँक्रिट बांधकाम करून नाल्याचा मार्ग अरुंद केला आहे, याकडे किनळेकर यांनी न. पं.चे मुख्याधिकारी अरविंद नातू यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे.या निवेदनात म्हटले आहे, बिल्डर्सनी या नाल्यावर चुकीच्या पद्धतीने पक्के काँक्रिट बांधकाम व माती भराव करून या नाल्याची पूर्वपार असलेली रुंदी व दिशा पूर्णपणे बदलून टाकली आहे. असे केल्याने येत्या पावसाळ्यात गवळदेव, तहसील कार्यालय, विठ्ठलवाडी तसेच हायवे, हॉटेल आरएसएन, उद्यमनगर, हॉटेल राज, पेट्रोल पंप परिसर येथून मोठ्या प्रमाणात येणारे पाणी संत राऊळ महाराज महाविद्यालय सर्कल या ठिकाणी साचणार आहे.या ठिकाणी दरवर्षी साचणारे पाणी हे हॉटेल गजालीला लागून असणाऱ्या नाल्यामार्फत निचरा होत असते. यापूर्वी या नाल्यावर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण नसताना सुद्धा महाविद्यालय सर्कल आसपासच्या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचून या ठिकाणच्या नागरिकांना त्रास होतच असतो आणि आता तर खासगी बिल्डर्सनी या नाल्यावर चुकीच्या पद्धतीने पक्के कॉक्रिट बांधकाम व भराव टाकून अतिक्रमण केले आहे.पावसाळ्यात नागरिक, व्यावसायिक व विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात साचणाऱ्या पाण्याला जाण्यासाठीचा मार्ग म्हणजे हा हॉटेल गजालीला लागून असणारा नाला तुंबल्यास मोठ्या प्रमाणात साचणाऱ्या पाण्यामुळे आसपासच्या भागातील नागरिक. व दुकान व्यावसायिकांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. तसेच नुकसान होण्याची शक्यता आहे. या परिसरातून महिला रुग्णालयात जाणारे रुग्ण, कुडाळ हायस्कूलचे विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, नर्सरी स्कूलचे विद्यार्थी, पालक, तहसील कार्यालयात जाणारे नागरिक यांची मोठी वर्दळ असते, याकडे किनळेकर यांनी लक्ष वेधले आहे. शहर आपत्ती व्यवस्थापन प्रमुख म्हणून न. पं. मार्फत या ठिकाणच्या नाल्याची योग्यरित्या पाहणी करून या नाल्यावरील झालेले अतिक्रमण हटवावे. एवढ्या मोठ्या प्रमाणात येणाऱ्या पाण्यासाठी लांबी, रुंदी, उंची, खोली असणारा नाला तयार करावा. संबंधितांवर योग्य ती कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशाराही दिला आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

