कणकवलीकोकणक्राइममहाराष्ट्र

टोलनाक्यावरून जाताच पैसे कट झाल्याचा मेसेज

*🛑टोलनाक्यावरून जाताच पैसे कट झाल्याचा मेसेज*

*🛑राजापूर-हातिवले टोल नाक्यावरील घटना : टोलनाक्यावर सिस्टिमच नाही अस्तित्वात*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली, दि-२२*:-राष्ट्रीय महामार्गावर राजापूर-हातिवले येथे टोलवसुलीची कोणतीही सिस्टिम कार्यरत नाही. तरीही येथून पुढे चारचाकी गाडी घेऊन जाताना एका प्रवाशाचे ‘एनईटीसी’ अंतर्गत २४० रुपये खात्यातून वजा झाले. संबंधित बँकेकडे चौकशी केली असता हे टोलसंदर्भातील पैसे असल्याचे सांगण्यात येते. ‘एनईटीसी” म्हणजे नॅशनल इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन प्रोग्रॅम असल्याचे सांगण्यात येते. जर हातिवले टोल अस्तित्वात नाही, तर मग हे पैसे नेमके कशासाठी कट झाले? राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या म्हणण्य ानुसार तेथे टोल सिस्टिमच अस्तित्वात नाही. मग या कट झालेल्या रकमेचे उत्तर कुणी तरी द्यावे, एवढीच संबंधित प्रवासी व जनतेची अपेक्षा आहे. राष्ट्रीय महामार्गावर ओसरगाव व राजापूर हद्दीत हातिवले येथे टोलनाके करण्यात आले. मध्यंतरी हातिवले येथे टोलवसुली सुरू झाली पण ती तातडीने बंद करण्यात आली. आजच्या स्थितीत हातिवले येथे टोलवसुलीची कोणतीही सिस्टिम अस्तित्वात नसल्याने तेथून टोलसाठीचे पैसे वसूल होऊ शकत नाहीत, असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे म्हणणे आहे. तसेच ज्या टोलचे पैसे वसूल होतात, त्या मेसेजमध्ये टोलचे नाव येते, असे सांगण्यात आले.कणकवली येथील मिलिंद सामंत हे १९ मे रोजी रत्नागिरीला जाताना हातिवले टोलनाका सोडल्यानंतर ‘एनईटीसी’ अंतर्गत त्यांचे २४० रुपये वजा झाले. हे पैसे नेमके कसले हे त्यांना न कळल्याने त्यांनी आपल्या बँकेशी संपर्क साधला. त्यांच्याकडून ही रक्कम टोलअंतर्गत कट झाल्याचे सांगण्यात आले, असे त्यांचे म्हणणे आहे.मुळात त्यांनी संबंधित चारचाकी गाडीसाठी त्या बँकेच्या अकाऊंटवर फास्टटॅग घेतला होता. परंतु, त्याचा कोड गाडीवर लावलेला नाही. तसेच ते तत्पूर्वी अन्य कुठे तरी गेले असावेत व नंतर मेसेज आला असे म्हणायचे, तर त्यांच्या म्हणण्यानुसार आठवडाभर ते कणकवलीच्या बाहेर फोर व्हिलर घेऊन गेलेच नव्हते. मग हे पैसे कसे वजा झाले, याचा उलगडा होत नाही. टोलवसुलीसाठीची डिजीटल प्रणाली? सामंत यांच्या खात्यातून ‘एनईटीसी’ अंतर्गत २४० वजा झाले हे दिसत आहे. ‘एनईटीसी’ म्हणजे काय, याचा शोथ घेतला असता ती नॅशनल इलेक्ट्रॉनिक टील कलेक्शन प्रोग्रॅम असल्याचे समजते. टोल प्लाझावरील वाहनांची अखंड हालचाल सुनिश्चित करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि इंडियन हायवेज में नेजमेंट कंपनी लि.चीही *टोलवसुलीसाठीची डिजिटल असल्याचे प्रणाली* सांगण्यात येते.पण जर टोलच अस्तित्वात नसेल, वसुली सिस्टिमच नसेल, तर तेथून टोलची रक्कम कशी वसूल झाली. जर ही रक्कम टोलची नसेल, तर कशासाठीची आहे? ती जर योग्य कारणासाठी असेल, तर कारण कोणते? नसेल तर अशाप्रकारे वसुली होणाऱ्या रकमेला दोषी कोण? तसेच ही रक्कम परत ग्राहकाला मिळणार का, असे ‘ अनेक प्रश्न असून याबाबत कुणी तरी संबंधित प्रवासी व जनतेसाठी उत्तरे देण्याची नितांत आवश्यकता आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!