सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील दोन दिवस ‘यलो अलर्ट’
*🛑सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील दोन दिवस ‘यलो अलर्ट’*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सिंधुदुर्गनगरी, दि-२१*:-सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील दोन दिवस २१ व २२ रोजी वादळी वारे, गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, सोमवारी सिंधुदुर्गनगरीसह जिल्हयाच्या काही भागात वादळी वारे, गडगडाटासह जोरदार पाऊस कोसळला. त्यामुळे नागरिकांची मोठी धावपळ उडाली होती. प्रादेशिक हवामान खाते मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या आदेशानुसार जिल्ह्यात २१ व २२ मे रोजी वादळी वारे, गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच ताशी ४० ते ५० कि.मी. वेगाने बारे वाहणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यात यलो अलर्ट जारी केला आहे. त्यानंतर २३ व २४ मे रोजी वादळी वारे व पावसाचा जोर कमी होणार असल्याने ग्रीन अलर्ट जारी केला आहे.यलो अलर्ट जारी असताना नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः वादळी वारे, गडगडाटासह जोरदार पाऊस सुरू असताना घराबाहेर पडू नये, मोठ्या झाडाखाली उभे राहू नये, वीज चमकत असताना टीव्ही, संगणक, विद्युत उपकरणे बंद ठेवावी, मोबाईल बंद ठेवावा. कुठल्याही आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी ०२३६-२२२८८४७ व टोल फ्री नंबर १०७७ या नंबरवर संपर्क करावा, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारणचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे. *जिल्ह्यात सोमवारी वादळी वारे, गडगडाटासह पाऊस* दरम्यान, गेले दोन चार दिवस पूर्व मोसमी पाऊसाचा धुमाकूळ सुरू असून सोमवारीही पाऊस कोसळला. सोमवारी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास वादळी वारे, गडगडाटासह जोरदार पाऊस कोसळला. त्यातच अनेक भागात विद्युत पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे उष्णतेने अंगाची काहिली होत होती.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

