बांदा – दाणोली मार्गावर डंपर आंब्याच्या झाडावर आदळल्याने अपघात.
बांदा – दाणोली मार्गावर डंपर आंब्याच्या झाडावर आदळल्याने अपघात.
बांदा:प्रतिनिधी:शैलेश गवस
बांदा – दाणोली मार्गावर वाफोली येथे धोकादायक वळणावर डंपर आंब्याच्या झाडाला आदळल्याने अपघात झाला आहे.सुदैवाने या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला.हा अपघात आज सायंकाळी ४ वाजण्याचा सुमारास झाला आहे.अपघातग्रस्त डंपर चालक दानोलीच्या दिशेने जात होता.प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार डंपरवरील ताबा सुटल्याने थेट डंपर आंब्याच्या झाडाला जाऊन आदळला असावा.याच धोकादायक वळणावर महिन्याच्या आत अपघात होण्याची दुसरी घटना घडली आहे.

