कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसामाजिक

वाघाच्या एन्ट्रीने वडखोलवासीय धास्तावले

*🛑वाघाच्या एन्ट्रीने वडखोलवासीय धास्तावले*

*🛑मागील महिनाभर निशाण तलाव परिसरात वाघ स्थिरावल्याची जोरदार चर्चा*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴वेंगुर्ले, दि-२०*:-वेंगुर्ले शहरातील भटवाडी परिसर आणि याच शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निशाण तलाव परिसरात पट्टेरी वाघाने उच्छाद मांडला असून आतापर्यंत या परिसरात बाहेर चरणाऱ्या व थेट गोट्यातील सुमारे पाच ते सहा गुरांना या वाघाने ठार मारल्याचे वृत्त हाती आले आहे. मागील महिनाभ्र याच परिसरात मुक्काम करून या वाघाने उच्छाद मांडला असून हळूहळू तो वस्तीच्या दिशेने सरकू लागल्याने या परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. यापूर्वी बिबटे थेट मानवी वस्त्यांमध्ये घुसून पाळीव कुत्रे, कोंबड्या, बकऱ्यांवर हल्ले करायचे. मध्यंतरीच्या काळात हत्तींनी मानवी वस्त्यांमध्ये घुसून शेतकऱ्यांच्या शेती- बागायतीवर हल्ले केले होते. त्यानंतर जंगली गव्यांनी मानवी वस्त्यांना, शेती बागायतीना लक्ष्य करीत प्रचंड उत्पाद माजवला. आता पट्टेरी वाघही वस्त्यांच्या दिशेने सरकू लागल्याने भीतीचे वातावरण आहे. वडखोल या गावात शहराला पाणीपुरवठा करणारा निशाण तलाव आहे. या तलावात मुबलक पाणीसाठा व आजूबाजूला जंगल असल्याने पट्टेरी वाघाने सध्या या परिसरात ठाण मांडल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. येथील नाल्यातून मार्ग काढत थेट वेंगुर्ले शहरातील भटवाडी परिसरापर्यंत वाघ येत असल्याचे आता निदर्शनास आले आहे. या वाघाने भटवाडीतील दिलीप सामंत यांच्या मालकीच्या घराच्या गोठ्यातील वासरावर हल्ला करून ते पळवून नेल्याचेही निदर्शनास आले आहे. अनेकांना या वाघाने सायंकाळच्या वेळेस रस्ता क्रॉस करताना दर्शन दिल्याचे बोलले जात आहे. याबाबत वनखात्याला माहिती देऊन या वाघाचा बंदोबस्ताची मागणी येथील नागरिकांनी केली आहे. पण वाघाला पकडण्याएवढे पिंजरे वनखात्याकडे नसल्यामुळे प्रत्येकाने सावध राहून स्वतःची काळजी स्वतःच घेणे, हाच एक मार्ग ग्रामस्थांपुढे शिल्लक राहिला आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!