अखेर निगुडे ग्रामपंचायतची मुख्य पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन 24 तासाच्या आत दुरुस्त
*अखेर निगुडे ग्रामपंचायतची मुख्य पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन 24 तासाच्या आत दुरुस्त माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी दिला होता ग्रामपंचायत प्रशासनला इशारा*
बांदा प्रतिनिधी: इन्सुली येथून निगुडे गावात जाणारी मुख्य ग्रामीण नळपुरवठा योजनेचे मुख्य पाईप लाईन गेली तीन महिने फुटून लाखो लिटर पाणी मात्र वाया जात आहे वारंवार यासंदर्भात ग्रामपंचायतला प्रशासनाला सूचना देऊन देखील यावर कोणती उपाययोजना केलेली नाही. अखेर निगुडे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी याची दखल घेत ग्रामपंचायत प्रशासनाला पाईपलाईन दुरुस्त करण्याचा इशारा दिला होता आणि २४ तासाच्या आत अखेर पाईपलाईन दुरुस्ती करण्यात आली नळ योजनेचा पंप सायंकाळी ०५ वा. ते सकाळी १०:०० वाजेपर्यंत चालू असतो. बारा ते चौदा तास पंप चालू केल्यानंतर पाईप लाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी पिण्याचे पाणी या ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभारामुळे वाहून जात होते यासंदर्भात ग्रामपंचायत प्रशासन पाईप लाईन दुरुस्ती करण्यास का दिरंगाई करत आहे?असा सवालही गवंडे यांनी उपस्थित केला होता. पाईपलाईन ही चार ठिकाणी फुटून हर घर घर जल असं असतानाही लाखो रुपये जलजीवन मिशन अंतर्गत खर्च करून लोकांना पुरेसं पिण्याचे पाणी मिळत नाही. यासंदर्भात सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक यांच्या या दुर्लक्षामुळे पाणी वाया जात होतं अशी टीकाही त्यांनी केली होती. विद्युत पंप आठ तासाऐवजी चौदा तास चालवावा लागत आहे. भविष्यात ग्रामपंचायत प्रशासनाच्या या अनागोंदी कारभारामुळे विद्युत पुरवठ्याची बिले ग्रामपंचायतीला मोठ्या प्रमाणात आली की याचा त्रास नळपुरवठा धारकांना वाढीव बिले आकारुन गावातील नागरिकांना त्रास देण्याचे काम ग्रा.पं. प्रशासन करणार आहे.कारण यापूर्वी प्रती १००० लि. युनिट ०७ रु. होते. ते ०९ रु. करण्यात आलेले आहे. तसेच निगुडे सोनुर्ली मुख्य रस्ता दुरुस्ती करत असताना पाईपलाईन ही खूप खोल खाली राहिल्यामुळे ती संरक्षक भिंतीच्या बाजूने न घेतल्यास भविष्यात पाईपलाईन फुटली तर दुरुस्ती करणे अवघड होणार आहे. त्यामुळे त्यावर आत्ताच उपयोजना करणे गरजेचे आहे. जर पाईप लाईन येत्या आठ दिवसात दुरुस्ती न केल्यास योग्य ती उपाय योजना न झाल्यास ग्रामपंचायतीला जशास तसे उत्तर दिले जाईल. असा इशारा निगुडे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी दिला होता याची दखल घेत सावंतवाडी पंचायत समिती गटविकास अधिकारी श्री वासुदेव नाईक यांनी ग्रामपंचायत प्रशासनला तात्काळ पाईपलाईन दुरुस्ती करण्याचे आदेश दिले पाऊस जर सुरू झाला असता आणि ही लाईन दुरुस्त करण्यास घेतली असती तर ते काम शक्य नव्हतं म्हणून ते काम योग्य वेळेत केलं पाहिजे होतं यासाठी माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी दिरंगाई का अशी विचारणा प्रसिद्ध माध्यमातून केली होती उद्या पासून पाणीपुरवठा सुरळीत होईल.

