सावंतवाडीत उद्या टेंब्येस्वामी पादुका मंदिर वर्धापन दिन
सावंतवाडीत उद्या टेंब्येस्वामी पादुका मंदिर वर्धापन दिन
प्रतिनिधी
सावंतवाडी सबनीसवाडा येथील एकमुखी दत्त मंदिर व वासुदेवानंद सरस्वती मंदिरात सोमवार, २० मे रोजी वासुदेवानंद सरस्वती टेंब्येस्वामी पादुका मंदिर वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
एकमुखी दत्त मंदिर व वासुदेवानंद सरस्वती मंदिरात सकाळी ६ ते रात्री ८ पर्यंत एकमुखी दत्तमूर्ती पूजा, एकादशमी, लघुरुद्र, अभिषेक, नामस्मरण आदी कार्यक्रम होतील. सकाळी ८ वाजता सत्यदत्त महापूजा, दुपारी १२.३० वाजता महाआरती, महाप्रसाद, सायंकाळी ५ वाजता तीर्थप्रसाद, ७ वाजता नामस्मरण, नंतर महाआरती, ७.४५ वाजता स्वामींचा पालखी सोहळा व स्थानिक दत्तगुरू भक्तांचे भजन, रात्री ८.३० वाजता सावंतवाडी सालईवाडा येथील गुरुप्रसाद भजन मंडळाचे भजन होणार आहे.
स्थानिक सल्लागार उपसमितीचे अध्यक्ष तथा सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक कुटुंबियांकडून दयानंद स्वामी गवस चरणी महाप्रसादरुपी सेवा अर्पण करण्यात आली आहे. उपस्थित राहवे, असे आवाहन एकमुखी दत्त मंदिर व वासुदेवानंद सरस्वती मंदिर स्थानिक सल्लागार आहे. उपसमितीने केले

