चिमुरड्याच्या शस्त्रक्रियेसाठी मदतीचे आवाहन
चिमुरड्याच्या शस्त्रक्रियेसाठी मदतीचे आवाहन
दुकानवाड
हळदीचे नेरुर-कोंदणवाडी येथील तुकाराम प्रशांत नाटेकर या सहा महिन्यांच्या मुलाच्या लिव्हरच्या शस्त्रक्रियेसाठी मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. हळदीचे नेरुर-कोंदणवाडी येथील तुकाराम नाटेकर या सहा महिन्यांच्या बालकाला लिव्हरचा आजार असल्याने त्याचे लिव्हर बदलणे आवश्यक आहे. त्यासाठी त्याचे वडील प्रशांत संजय नाटेकर हे आपले लिव्हर देणार आहेत.
शस्त्रक्रिया करण्यासाठी १५ ते १६ लाख रु. खर्च येणार आहे. हे कुटुंब मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. परंतु बाळाचे प्राण वाचावेत म्हणून कर्ज काढून शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय कुटुंबाने घेतला आहे. त्यांना दात्यांच्या मदतीची गरज आहे.
मदत करू इच्छीणाऱ्यांनी मोबा-७२४९५१६२६३ या फोन पे नंबरवरून (प्रशांत नाटेकर) मदत करू शकतात.
