इळये सडा येथे वृद्धेची आत्महत्या
इळये सडा येथे वृद्धेची आत्महत्या
देवगड,-
इळये सडा येथील वैशाली रमेश वारंग (६७) यांनी आजारपणाला कंटाळून कीटकनाशक प्राशन केले. त्यांना तात्काळ देवगड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेची नोंद देवगड पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैशाली वारंग या एका अल्पशा आजाराने त्रस्त होत्या. त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, त्यांची तब्येत
सुधारत नव्हती. या आजारपणाला कंटाळून त्यांनी शुक्रवारी रात्री घरात ठेवलेले आंबा कलम फवारणीचे कीटकनाशक प्राशन केले. त्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले. ही बाब घरातील नातेवाईकांच्या लक्षात येताच नातेवाईकांनी त्यांना तात्काळ देवगड येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती त्यांचा मुलगा सचिन रमेश वारंग (३९) F यांनी देवगड पोलीस स्थानकात दिली. घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू अशी करण्यात आली आहे. घटनेचा तपास पोलीस हवालदार राजन जाधव करीत आहेत.

