कोकणक्राइममहाराष्ट्र

तळेरेत कारच्या धडकेने दुचाकीवरील दोघे जखमी

तळेरेत कारच्या धडकेने दुचाकीवरील दोघे जखमी

तळरे-

तळेरे महामार्गावरील तळेरे येथील कोचरेकर पेट्रोल पंपासमोरील बेकायदेशीरपणे फोडलेल्या दुभाजकामधून विरुद्ध दिशेचा रस्ता पार करत नजीकच्या पेट्रोल पंपावर जात असलेल्या वी दुचाकीला गोव्याच्या दिशेने जात सर्व असलेल्या कारची धडक बसली. नर्क शुक्रवारी दुपारी २.३० वा. च्या सुमारास झालेल्या या अपघातात चालक सुधीर सदानंद टक्के (३८) व मागे बसलेले तुषार सुभाष टक्के (३४. दोन्ही रा. शिडवणे) हे दाघेही पुरवठा जखमी झाले. अपघातात दुचाकी व कारचेही बरेच नुकसान झाले.
अपघातात सुधीर व तुषार दोघेही
रस्त्यावर फेकले गेले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना कासार्डे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल करण्यात आले. पण, दुखापती गंभीर असल्याने दोघांनाही कणकवलीतील खासगी रुग्णालयत हलविण्यात आले. अपघाताची सायंकाळी उशिरापर्यंत पोलिसांत नोंद नव्हती.
महामार्गावरील बेकायदेशीरपणे फोडलेले दुभाजक अपघातांना निमंत्रण देत आहेत. याबाबत संबंधित शासकीय विभागांनी योग्य ती कार्यवाही करण्याची गरज असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!