कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

सावंतवाडी बसस्थानकात एसटी अधिकारी धारेवर

*🛑 सावंतवाडी बसस्थानकात एसटी अधिकारी धारेवर*

*🛑 फलाटावरील बस उशिराने सोडल्याने प्रवासी संतप्त*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-१८*:-येथील बसस्थानकातील फलाटावर लावलेली बस तासाभरानंतर सोडण्यात आल्याने संतप्त प्रवाशांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत एसटीच्या नियोजनशून्य कारभाराबाबत संताप व्यक्त केला. सावंतवाडी आगारातून गुरुवारी दुपारी १२.३० वाजता सुटणारी देवरुख एसटी बस फलाटावर बारा वाजता लावण्यात आली. प्रवाशांनी या बससाठी गर्दी केली. बस पूर्णपणे प्रवाशांनी भरली होती. १२.३० वाजले, तरी बस मार्गस्थ झाली नाही. त्यामुळे प्रवासी बसमध्ये उष्म्यामुळे हैराण झाले होते. त्यात लहान मुलेही रडू लागली. पाऊण तास प्रवासी घामाने भिजून गेल्याने संतप्त झाले. प्रवाशांचा पारा चढल्याने त्यांनी बसमधून उतरत कंट्रोल केबिनमधील कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. स्थानकप्रमुखांनी प्रवाशांची समजूत काढून वाहक, चालकांची असलेली कमतरता लक्षात आणून दिली. तरीही प्रवासी संतापले होते. अखेर वाहक उपलब्ध करून दिल्यानंतर तब्बल तासाभराने एक वाजता बस मार्गस्थ झाली. कडकडीत उन्हाळा, गर्दीच्या हंगामात प्रवाशांच्या सोईसाठी पूर्व नियोजन होणे गरजेचे आहे. तरच एसटी उत्पन्नात वाढ होणार आहे. बसस्थानकातील प्रवाशांना बसेस सुटण्याच्या वेळेची माहिती कंट्रोल केबिनमधील माईकवरून अनाउन्समेंटद्वारे दिली जाते. परंतु गेले दोन दिवस लाऊडस्पिकर सिस्टिम बंद आहे. त्यामुळे प्रवाशांना कंट्रोल केबिनमध्ये जाऊन माहिती घेण्याची वेळ येते. कंट्रोल केबिनमधील कर्मचाऱ्याकडून प्रवाशांच्या सूचना व माहितीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. गर्दीचा हंगाम आणखी महिनाभर आहे. त्यामुळे आगारातून नियोजनपूर्ण नियमित व जादा गाड्या सोडल्यास आगाराचे उत्पन्न वाढू शकेल. त्यासाठी आगाराकडून चोख नियोजन होणे गरजेचे आहे. याबाबत स्थानकप्रमुख विशाल शेवाळे यांना विचारले असता, आगारात वाहक व चालकांची गेल्या पंधरा दिवसांपासून कमतरता आहे. गाड्या वेळापत्रकाप्रमाणे सोडण्यासाठी वाहक, चालकाला डबल ड्युटी लावून प्रवाशांना सेवा दिली जाते. आगारात गाड्यांची संख्या आहे, परंतु वाहक व चालक असे एकूण ६० कर्मचारी कमी असल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांकडून प्रवाशांना सेवा दिली जात आहे. आगारात ३५ वाहक व २५ चालक असे कर्मचारी कमी आहेत. उर्वरित १०० वाहक व ११० चालक या कर्मचाऱ्यांवरच वेळापत्रकानुसार गाड्या सोडून प्रवाशांना सेवा देण्याचा प्रयत्न केला जातो. आज दुपारी १२.३० वाजता सुटणारी देवरुख बस चालकाने अर्धा तास अगोदर लावल्याने हा प्रकार घडला. त्यामुळे प्रवाशांना उन्हाचा त्रास होऊन गोंधळ झाला.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!