वेंगुर्ले आगारातील निकृष्ट काम रोखले
*🛑वेंगुर्ले आगारातील निकृष्ट काम रोखले*
*🛑भाजपप्रणीत सेवा शक्ती संघर्ष कामगार संघाचे पदाधिकारी आक्रमक*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴वेंगुर्ले, दि-१७*:-वेंगुर्ले आगाराच्या नूतनीकरणाचे काम अत्यंत चुकीच्या पद्धतीने सुरू आहे. या कामाचे अंदाजपत्रकच चुकीचे बनविले गेले असल्याने शासनातर्फे मंजूर असलेला निधी पाण्यात जाण्याची शक्यता आहे. आधीच विविध समस्यांच्या गर्तेत सापडलेल्या या आगाराला नूतनीकरणाच्या माध्यमातून दर्जा देण्याचे सोडून कामगार व प्रवाशांसमोरील अडचणी अधिक वाढविण्याचा घाट घातला जात आहे. त्यामुळे हे काम तात्काळ थांबविण्यात यावे, विभाग नियंत्रकांसमोबत भाजपप्रणीत सेवा शक्ती संघर्ष कामगार संघाची बैठक बोलवा. त्यानंतरच हे काम करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, अशा सक्त सूचना संतप्त कामगारांनी तेथे उपस्थित सहाय्यक अभियंत्यांना दिल्या.वेंगुर्ले आगारातील विविध प्रश्नांसंदर्भात या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी काही दिवसापूर्वी वेंगुर्ले आगाराला भेट दिली होती. या भेटीदरम्यान आगाराच्या नूतनीकरणाचे अत्यंत चुकीच्या पद्धतीने चाललेल्या कामाबाबत त्यांनी आक्षेप घेतला होता. जोपर्यंत अधिकाऱ्यांशी योग्य नियोजनाबाबत चर्चा होत नाही तोपर्यंत काम करू नका, अशा सूचना त्यांनी त्यावेळी दिल्या होत्या. मात्र, संघाच्या सूचनांना केराची टोपली दाखवत नूतनीकरणाचे काम सुरूच होते. दरवर्षी पावसाळ्यात हा भाग पाण्याखाली जात असल्याने कामगारांची मोठी तारांबळ होत असते. नूतनीकरणाच्या कामात या भागाची उंची वाढविण्याचेही काम आहे. ठेकेदाराने मात्र अधिकाऱ्यांनी केलेल्या आराखड्यानुसार काम सुरू केले आहे. उंची वाढविण्याचे सोडून तेथील माती काढून ठेकेदाराकडून सिमेंट काँक्रिटने पिचिंगचे काम सुरू करण्यात आले आहे. शासनाकडून मंजूर झालेल्या निधीचा हा अपव्यय आहे. येथील भौगोलिक स्थितीचा किंवा पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या समस्यांचा जराही अभ्यास न करता अभियंत्यांने कामाचा आराखडा तयार केला आहे. या चुकीच्या आराखड्यामुळे काम होईल, पण त्यामुळे कामगारांना अधिकचा मनस्ताप सहन करावा लागेल, असा आरोप यावेळी करण्यात आला. भाजपप्रणीत सेवा शक्ती संघर्ष कामगार संघटनेचे आगार अध्यक्ष तथा भाजपचे उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांनी या कामाला जोरदार आक्षेप घेत हे काम पूर्णपणे बंद करण्याची सूचना अभियंत्यांना दिली. कामगार संघाचे वेंगुर्ले आगार उपाध्यक्ष सखाराम सावळ, आगार सचिव दाजी तळवणेकर, विभागीय सहसचिव महादेव भगत, महिला संघटक सेजल रजपूत आदी यावेळी उपस्थित होते. अभियंता केंकरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या भावनांचा आदर करत काम बंद ठेवण्याचे आश्वासन देत लवकरच बैठकीबाबत वरिष्ठांशी बोलण्याची ग्वाही दिली.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
