कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

ठेकेदाराने नियमबाह्यपणे वाहतूक केली एकमार्गी

*🛑ठेकेदाराने नियमबाह्यपणे वाहतूक केली एकमार्गी*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴बांदा, दि-१४*:-बांदा येथे महामार्गावर सुरू असलेल्या नियोजित उड्डाणपुलाच्या कामाच्या ठिकाणी कंत्राटदाराकडून बेजबाबदारपणे व नियमबाह्य पद्धतीने वाहतूक एकमार्गी वळविण्यात येत आहे. त्यामुळे मागील आठवडाभर महामार्गावरून वाहतूक करणाऱ्यांना तसेच स्थानिक नागरिकांना वाहतूक कोंडीमुळे प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.मागील आठवडाभरात सदर ठिकाणी रोज अपघात होत असून अॅम्बुलन्ससारख्या अत्यावश्यक सेवादेखील त्यामुळे प्रभावित होत आहेत. या सर्व त्रासाला कंटाळत बांदा येथील स्थानिक ग्रामस्थांनी महामार्ग वाहतूक नियंत्रण कक्ष, मुंबई तसेच महामार्ग वाहतूक नियंत्रक, सिंधुदुर्ग विभाग यांच्याकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेत सदर विभागाकडून दोन वाहतूक नियंत्रकांची नियुक्ती करण्यात आली होती. परंतु सदर वाहतूक नियंत्रकांच्या कामकाजाची वेळ संपल्यानंतर सदर ठिकाणी पुन्हा प्रचंड वाहतूक कोंडीची समस्या उद्भवू लागली. याकरिता पुन्हा एकदा बांदा ग्रामस्थांनी एकत्र येत बांदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बडवे यांची भेट घेत त्यांना निवेदन सादर केले. महामार्ग वाहतूक नियंत्रण कक्ष व जिल्हा वाहतूक नियंत्रकांशी समन्वय राखत याबाबत त्वरित कार्यवाही करण्याची विनंती करण्यात आली.यावेळी ग्रामस्थ प्रतिनिधी म्हणून कल्याणकर, हेमंत दाभोलकर, गुरू प्रशांत बांदेकर, सिद्धेश महाजन, आबा धारगळकर, रुपाली शिरसाट, मनोज कल्याणकर, शैलेश केसरकर, उदय येडवे, स्मिता पेडणेकर, साई सावंत व आशिष कल्याणकर उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!