तीन उपोषणकर्त्यांची तब्येत ढासळली; सावंतवाडी कुटीर रुग्णालयात केले दाखल
▪️महालक्ष्मी अंध, अपंग, निराधार, संघटनेचे बाबासाहेब आंबेडकर प्रांगणात सुरु आहे उपोषण..
▪️आपत्ती व्यवस्थापन कायदा मोडणाऱ्या नकुल पार्सेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी,दि.०३: संपूर्ण भारत देशात लाॅकडाउन असताना पुण्यासारख्या रेडझोन मधून आपले जावई व मुलीला आणून ग्रामपंचायतीची परवानगी न घेता परस्पर घरात काॅरंटाईन केल्याप्रकरणी नकुल पार्सेकर यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन व साथ प्रतिबंधक रोग निवारण कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी गेले तीन दिवस उपोषण करत असलेले अंध अपंग निराधार बांधव भर उन्हात उपोषण करत असल्यामुळे त्यातील तिघांची प्रकृती खालावली असून त्यांना अधिक उपचारासाठी सावंतवाडी कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सावंतवाडी बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिरासमोर सुरू असलेले उपोषण सावंतवाडी पोलीस निरीक्षक शशिकांत खोत, तहसीलदार राजाराम म्हात्रे, नगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. मसुरकर यांच्या व्यतिरिक्त त्याठिकाणी कोणीही फिरकले नाहीत. खरेतर संबंधित विषय हा तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे येतो. मात्र, त्यांनी याबाबत हात झटकून जणू आपल्याशी त्याचे काहीच देणे घेणे नाही. अशा पद्धतीने व्यवहार केला आहे. तर सावंतवाडी शहराचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मसुरकर यांनी श्री. पार्सेकर यांनी माजगाव गरड येथे क्वारंटाइन केल्यामुळे तो भाग शहरात येत नाही व आपल्याकडून तशी परवानगी कुणी घेतली नाही. असे स्पष्ट केले आहे. मात्र, पार्सेकर यांच्या मुलीच्या पासवर खासकीलवाडा असे लिहीले होते. मात्र, त्या पत्त्यावर ते राहिले नाहीत. तो पत्ता नजरचुकीने दिला गेला असा खुलासा त्यांनी केला होता.
१४ दिवसाचे संस्थात्मक क्वारंटाईन असताना श्री. पार्सेकर यांनी आपल्या मुलीला व जावईला माजगाव गरड येथील आपल्या राहत्या घरात नेऊन क्वारंटाईन केले. याबाबत तेथील ग्रामपंचायतीने आक्षेप घेऊन गावातील ग्रामस्थांच्या सह्यांचे निवेदन दिले होते.
वास्तविक ग्रामपंचायतीच्या भागात क्वारंटाईन व्हायचे असेल तर संबंधित ग्रामपंचायतीची नाहरकत परवानगी घ्यावी लागते. मात्र, अशा प्रकारची ग्रामपंचायतीला कोणतीही माहिती मिळाली नाही. असे सरपंच यांचे म्हणणे होते. म्हणून ग्रामस्थांनी तक्रारीचे निवेदन तहसीलदार, प्रांत अधिकारी यांना दिले होते. मात्र, त्यावर कोणतीही उचित कार्यवाही न झाल्याने सर्वांना समान न्याय या मागणीसाठी अंध, अपंग, निराधार, गेले तीन दिवस डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर समोर उपोषणास बसले आहेत. ज्यांनी कायदा मोडला त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा एवढीच रास्त मागणी घेऊन ते गेले तीन दिवस उपोषण करीत आहेत.
आज उपोषण करत असलेले समीर गवंडे, हरिश्चंद्र राउळ, विठ्ठल शिरोडकर यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर महालक्ष्मी अंध अपंग निराधार संघटने आमच्या जीविताचे काय बरेवाईट झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील असा इशारा दिला आहे.
*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*
*💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*
⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻♀️
⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻♂️
*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*
*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*
_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._
_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._
*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*
_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
_*💁🏻♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804
_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

