कोकणमहाराष्ट्रमालवणशैक्षणिक

हर्षदा पवारची राष्ट्रीय फायरिंग स्पर्धेसाठी निवड

*🛑हर्षदा पवारची राष्ट्रीय फायरिंग स्पर्धेसाठी निवड*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴मालवण, दि-०९*:-सिंधुदुर्ग कॉलेज एनसीसी विभागाची विद्यार्थिनी हर्षदा पवार हिचे आर्मीच्या राष्ट्रीय पातळीवरील फायरिंग कॉ म्पिटिशनमध्ये चौथ्या राऊंडसाठी महाराष्ट्रातून निवड झाली आहे. इंडियन आर्मीमार्फत घेण्यात येत असलेल्या राष्ट्रीय पातळीवरील फायरिंग कॉम्पिटिशनमध्ये महाराष्ट्रातून २४ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. यात येथील स. का. पाटील कॉलेजातील एनसीसी विभागाची हर्षदा पवारचा समावेश आहे. आता तिची चौथ्या राऊंडमध्ये निवड झाली आहे. यासाठी ५८ महाराष्ट्र बटालियन सिंधुदुर्गचे कमानी ऑफिसर कर्नल दीपक दयाल, सुभेदार मेजर दिनेश गेडाम व इतर आर्मी ऑफिसरांचे सहकार्य लाभले. हर्षदा पवार ५८ महाराष्ट्र बटालियन सिंधुदुर्गमार्फत स्पर्धेत उतरलेली आहे. तिला स. का. पाटील कॉलेजचे एनसीसी विभागप्रमुख लेफ्टनंट प्रा. एम. आर. खोत यांचे मार्गदर्शन लाभले. एसवाय बीकॉममध्ये ती शिकत आहे. तिने कॉलेजची एनसीसी जॉईन केलेली आहे. एनसीसी मार्फत ती वेगवेगळ्या फायरिंग कॉम्पिटिशन व इतर अॅडव्हेंचर कॅम्पमध्ये सातत्याने सहभागी होऊन कॉ लेजला भरभरून यश प्राप्त करून देत आहे. कॉलेजचे प्राचार्य शिवराम ठाकुर, सर्व शिक्षक कर्मचारी, कृ. सी. शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पंतवालावलकर, सचिव गणेश कुशे आदींनी हर्षदा पवारचे अभिनंदन केले. कॉलेज करताना एनसीसी जॉईन केल्यास त्याचे अनेक फायदे आहेत. संरक्षण, पोलीस दलात करिअर करता येते. इतरही क्षेत्रांमध्ये मोठी संधी उपलब्ध होते. विद्यार्थ्यांनी एनसीसीमध्ये प्रवेश घ्यावा आणि सिंधुदुर्गचा नावलौकिक करावा, असे आवाहन एनसीसी विभागप्रमुख लेफ्टनंट प्राध्यापक खोत यांनी केले केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!