🛑 पोलिसांना शिवीगाळ करून सरकारी कामात हस्तक्षेप केल्याच्या आरोपातुन दोन आरोपींची निर्दोष मुक्तता..
🛑 आरोपींतर्फे ॲड.सुरेंद्र तेली यांचा यशस्वी युक्तिवाद..
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-०८:- पोलिसांना शिवीगाळ करून अटक करण्याच्या कामात अडथळा केल्याच्या आरोपातून आज प्रमोद वसंत वालावलकर व साहिल प्रमोद वालावलकर दोघेही रा.वालावलकर यांची ओरोस येथील मे.जिल्हा न्यायाधीश -2 व सहा.सत्र न्यायाधीश साहेब श्रीम.देशमुख यांनी सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली. आरोपी तर्फे ॲड.सुरेंद्र तेली यांनी काम पाहिले. दिनांक 19/11/2021 रोजी फिर्यादी निवती पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी श्री गोविंद वारंग हे आरोपी यांनी वालावल येथील तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीना अटक करण्यासाठी गेले असता आरोपी यांनी संगणमत करून पोलीस स्टाफच्या अंगावर धावत जाऊन शिवीगाळ करून पोलीस अधिकारी श्री वारंग यांना मारहाण करून त्यांच्या चष्म्याची तोडफोड करून नुकसान करून पोलीस स्टाफ आपले शासकीय कामं पार पाडत असताना त्यांचे कामात अडथळा निर्माण केल्यामुळे आरोपीविरुद्ध भा. दं. वि कलम 353,332,504,427 सह 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर कामी सरकार पक्षातर्फे ५ साक्षीदार तपासण्यात आले होते. साक्षीदारांच्या साक्षीतील तफावत व आरोपी तर्फे ॲड.सुरेंद्र तेली यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून आरोपींची ओरोस न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. तसेच यापुर्वी दोन्ही आरोपीची कुडाळ येथील मे. प्रथमवग न्यायदंडाधिकारी साहेब श्री. ढोरे यांनी भा. दं. वि कलम 354,354अ, (1), (2), (4), 509,324,504 सह 34 सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

