पैसे घेतल्याचा आरोप सिद्ध करून दाखवा !
*🛑पैसे घेतल्याचा आरोप सिद्ध करून दाखवा !*
*🛑दीपक केसरकरांचे वैभव नाईकना आव्हान : पैसे वाटत असतील तर तक्रार करा !*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-०७*:-तुम्हाला कुडाळ मतदारसंघातून निवडून आणण्यासाठी मी लढा दिला. आता तुम्ही निवडून येऊन दाखवा. मी एक रुपयाही कुणकडून घेतलेला नाही. शिर्डीच्या साईबाबांवर माझी श्रद्धा आहे. तुम्ही शिर्डीला साई मंदिरात या आणि हात लावून सांगा की मी ५० खोके घेतले म्हणून. होऊन जाऊदे एकदाचे, असे आव्हान शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत दिले. मुंबईहून त्यांनी ऑनलाईन पत्रकार परिषद घेतली.मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात उद्धव ठाकरे माझ्यासह आमदारांना वर्षा बंगल्याच्या बाहेर तिष्ठप्त ठेवायचे. मात्र, मला नारायण राणे मुख्यमंत्री असताना सन्मानाची वागणूक देत होते, असेही केसरकर म्हणाले. आम्ही स्वाभिमानाने जगतो. एकही पैसा निवडणुकीत वाटला नाही किंवा मी कुणाकडूनही घेतला नाही. त्यामुळे तोंड सांभाळून बोला, असा इशारा केसरकर यांनी दिला.आमदार वैभव नाईक यांनी आक्षेपार्ह विधान केले आहे की, ए, बी आणि सी असे गट ठरवून पैसे वाटप केले जात आहे. आमदारांना ५० खोके दिले त्यांचा आरोप खोटा आहे. कोकणी माणूस किंवा आमदार लाचारी पत्करणार नाही. तुम्हाला आमदार म्हणून निवडून आणण्यास मी मदत केली. माझ्यामुळे तुम्ही आमदार झाला, हे विसरू नका. तुमच्या वैयक्तिक अडचणीमुळे तुम्ही आमच्याबरोबर आला नाहीत, हे समजू शकतो. मी आजही ठाकरे कुटुंबियाच्या आदरापोटी उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांच्यावर सौजन्याने बोलतो. पण कोकणी माणसाच्या स्वाभिमानाला कोणी ठेच पोहोचवली तर कोकणी माणूस गप्प राहणार नाही. तुम्ही निवडणुकीत मतदारांना पैसे वाटप करत असाल. पण मी निवडणुकीत एकही पैसा वाटप करत नाही. त्यामुळे मी एकही रुपया घेतला नाही किंवा एकही रुपया वाटला नाही., असेही केसरकर यांनी स्पष्ट केले.बाळासाहेबांच्या विचारापोटीत आम्ही बाहेर पडलो. आम्ही स्वाभिमानाची लढाई लढत आहोत आणि ती जिंकूही. मतांसाठी कोण पैसे वाटत असेल तर तक्रार केली पाहिजे. आम्हालाही लोक सांगतात की, ‘उबाठा’वाले पैसे वाटतात. पण आम्ही त्याबाबत बोललो नाही, असेही केसरकर म्हणाले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

