भर उन्हात उपोषणास बसलेल्या अंध अपंग निराधार लोकांना पाहून अधिकारीही गहिवरले
नकुल पार्सेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी दुसऱ्या दिवशीही उपोषण सुरूच
तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या प्रश्नी स्पष्टीकरण देणे गरजेचे
लॉकडाऊन काळात पुण्यासारख्या रेड झोन मधून आपल्या जावई व मुलीला अवघ्या काही दिवसातच त्यांना आपल्या घरामध्ये ठेवल्या प्रकरणी नकुल पार्सेकर यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन तसेच साथ प्रतिबंधक रोग निवारण कायदा नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी कालपासून भर उन्हात अंध,अपंग, निराधार लोक उपोषणास बसले आहे.
त्या अंध, अपंग, निराधार, माणसांचे फक्त एवढेच म्हणणे आहे की कायदा सगळ्यांसाठी सारखाच आहे, मग पार्सेकर यांच्यावर कारवाई का नाही? मात्र या प्रश्नाचे उत्तर अधिकारी देऊ शकले नाहीत. माजगाव गरड येथील आपल्या घरामध्ये पुण्यासारख्या रेड झोन मधून आलेल्या आपल्या जावई व मुलीला ग्रामपंचायत ची परवानगी न घेता घरात ठेवल्याप्रकरणी माजगाव ग्रामस्थांनी सह्यांचे निवेदन देऊन कारवाईची मागणी केली होती, या निवेदनावर माजगाव सरपंच दिनेश सावंत सहित विविध घटकातील ग्रामस्थांच्या सह्या होत्या.
मात्र त्या निवेदनावर कोणतीही कार्यवाही प्रशासनाकडून झाली नाही संपूर्ण देशात लाॅक डाऊनअसताना होम क्वारंटाईन नसताना श्री पार्सेकर यांनी आपल्या जावयाला व मुलीला ते घरात आणून ठेवले या विषयावरून हा वादंग सुरू झाला आहे. सर्वसामान्य जनतेला एक न्याय मोठ्या माणसांना वेगळा न्याय हे कुठेतरी थांबले पाहिजे यासाठी हे अंध अपंग ,निराधार, उपोषणास बसले आहेत
प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी या उपोषणस्थळी आले नाहीत, वास्तविक तालुका आरोग्य अधिकारी याठिकाणी उपस्थित राहून उपोषणकर्त्यांची म्हणने ऐकून घेणे गरजेचे होते कारण हा क्वारंटाईन चा संपूर्ण विषय तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशी निगडित आहे. मात्र अधिकारीवर्ग याठिकाणी फिरकले नाही ज्यांना डोळ्याने दिसत नाही ,नीट चालता येत नाही, असे अंध अपंग, निराधार, पंचवीस ते तीस जण भर उन्हात उपोषण करतात मात्र त्यांची उपोषणाची दखल घेतली जात नाही, त्यांना योग्य आश्वासन दिले जात नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे.