आमच्याकडे पैसा नाही, जनतेचा आशीर्वाद आहे !
*🛑आमच्याकडे पैसा नाही, जनतेचा आशीर्वाद आहे !*
*🛑सावंतवाडी मतदारसंघात ३५ हजाराचे मताधिक्य मिळणार- विनायक राऊत : कोलगाव येथे इंडिया आघाडीची प्रचारसभा*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- ०१*:-नारायण राणे व दीपक केसरकर एकत्र आले तरी जनताजनार्दनाच्या आशीर्वादाने सावंतवाडी हे. विधानसभा मतदारसंघात आपल्याला ३५ हजाराचे मताधिक्य मिळणार आहे, असे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी कोलगाव येथे आयोजित प्रचार सभेत केले. आमच्याकडे पैसा नाही. परंतु, जनतेचा आशीर्वाद आहे. राऊत निवडून आला तरी उतणार नाही, मातणार नाही, सदैव जनतेच्या हितासाठी कार्यरत राहणार, असे राऊत म्हणाले.इंडिया आघाडीचे उमेदवार राऊत यांच्या प्रचारार्थ कोलगाव येथील पाटीदार समाजाच्या सभागृहात सभा झाली. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवीण भोसले, अर्चना घारे परब, पुंडलिक दळवी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, ज्येष्ठ नेते विकास सावंत, अॅड. दिलीप नार्वेकर, महेंद्र सांगेलकर, ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पडते, संपर्कप्रमुख शैलेश परब, जिल्हा समन्वयक बाळा गावडे, जिल्हा महिला आघाडी प्रमुख जान्हवी सावंत, रुपेश राऊळ, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, शेतकरी नेते वसंत केसरकर, रेवती राणी, जि. प. चे माजी सदस्य मायकल डिसोजा, पंचायत समितीचे माजी सदस्य मेघःश्याम काजरेकर आदी उपस्थित होते. *केसरकरांचा डिसोजांच्या उमेदवारीला होता विरोध !* यावेळी विनायक राऊत म्हणाले, जिल्हा परिषद निवडणुकीच्यावेळी सध्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मायकल डिसोजा यांना शिवसेनेतर्फे उमेदवारी देण्यास विरोध केला होता. त्यांनी आपल्या एका उमेदवाराचे नाव त्यासाठी पुढे केले होते. परंतु मायकल डिसोजा हा सच्चा कार्यकर्ता असल्याने त्यांना उमेदवारी द्यावी, असे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी सांगितले. त्यामुळे डिसोजा यांच्या पाठिशी मी राहिलो, माझी तक्रार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. मात्र, पक्षप्रमुखांनी डिसोजा यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील दाखवला. डिसोजा निवडून आले, केसरकर यांनी डिसोजा यांना शिवीगाळ केली एखाद्या व्यक्तीबद्दल केसरकर यांच्या मनात किती द्वेषभावना असते हे यातून दिसून आले. साळगावकर याचे साक्षीदार आहेत. यातून केसरकर हे भविष्यात वेगळी भूमिका घेणार हे आम्हाला त्यावेळी जाणवले होते. त्यानुसार पूर्वीच्या इतिहासाप्रमाणे त्यांनी शिवसेनेशी गद्दारी करून खोक्यांसाठी शिंदे सोबत गेले. मात्र, केसरकर यांची ही संस्कृती मतदार स्वीकारणार नाहीत. आतापर्यंत दहशतवाद हा मुद्दा उपस्थित करून गेले कित्येक वर्षे नारायण राणे यांच्यावर हल्ला करून जनतेतून सहानभूती घेत होते. परंतु त्याच राणे यांना केसरकर यांनी मिठी मारलेली आहे. राणे व केसरकर हे एकत्र आले तरी ते जनतेला पटलेले नाही. त्यामुळे या मतदारसंघात आपल्याला ३५ हजारांचे मताधिक्य मिळणार आहे, हे केसरकर यांनी लक्षात ठेवावे, असे खासदार राऊत म्हणाले. खासदार राऊत हे हॅट्ट्रिक करणार आहेत. या सरकारमध्ये विनायक राऊत हे मंत्री असणार आहेत. त्यामुळे त्यांना विजयी करावे, असे आवाहन इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

