निष्ठावंत कार्यकर्ते हीच आमची ताकद!
*🛑 निष्ठावंत कार्यकर्ते हीच आमची ताकद!*
*🛑 मालवणमध्ये आमदार वैभव नाईक यांचे प्रतिपादन : विनायक राऊतांचा विजय निश्चित !*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मालवण, दि-०१*:-इंडिया महाविकास आघाडीचे सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार विनायक राऊत यांचा प्रचार करण्यासाठी कार्यकर्ते गावोगावी फिरत आहेत. जिल्ह्यात कडाक्याचे ऊन असून अंगाची लाही लाही होत घामाच्या धारा वाहत असताना देखील कार्यकर्ते याची पर्वा न करता आणि रुपयाचीही अपेक्षा न बाळगता मतदारांच्या घरोघरी जाऊन प्रचार करीत आहेत. सिंधुदुर्गात दहशत निर्माण करणाऱ्यांना या निवडणुकीत कायमचे हद्दपार करून विनायक राऊत यांना पुन्हा एकदा विजयी करण्यासाठी मेहनत घेत आहेत. हेच निष्ठावंत शिवसैनिकांचे शिवसेनेवर आणि उद्धव साहेबांवर असलेले प्रेम आहे. निष्ठावंत शिवसैनिक हीच शिवसेनेची ताकद आहे, अशा शब्दात आमदार वैभव नाईक यांनी शिवसैनिकांचे कौतुक केले आहे. आमदार नाईक शिवसैनिकांसमवेत प्रचारात उतरून त्यांचे मनोबल वाढवीत आहेत.मालवण तालुक्यात आज ठिकठिकाणी शहर व ग्रामीण भागात ठाकरे शिवसेनेच्यावतीने प्रचारफेऱ्या काढण्यात आल्या होत्या. त्यामध्ये आमदार नाईक हे सहभागी होत शिवसैनिकांना प्रचाराबाबत मार्गदर्शन करीत होते. यावेळी बोलताना श्री. नाईक म्हणाले की, पक्ष, आमदार, खासदार फोडणे हे भाजप, महायुती आणि एनडीएतील घटकपक्ष असलेल्या ईडी आणि सीबीआयचे काम सुरूच असते. मात्र, महाविकास आघाडी सातत्याने महाराष्ट्र हित आणि महाराष्ट्राच्या विकासाबाबत बोलत आहे. महाराष्ट्रातून उद्योगधंदे राज्याबाहेर का जात आहे. कृषीक्षेत्र अडचणीत का आहे, दोन वर्षांपासून राज्याचा विकास का झाला नाही यावर चर्चा होणे आवश्यक आहे. मात्र, या मुद्यांवर चर्चा करण्याची हिंमत सत्ताधाऱ्यांमध्ये नाही. त्यामुळे काही विरोधक आमच्याविरोधात बोलण्यासाठी पाठवत आहेत. त्यामुळे अशा लोकांना आपण महत्त्व देत नाही, असेही श्री. नाईक यांनी स्पष्ट केले. आता भाजप धार्मिक मुद्यांवर बोलत आहे. जेव्हा-जेव्हा भाजप मागे पडते, तेव्हा ते धार्मिक विषय आणायचा प्रयत्न करतात. असे मुद्दे उचलून विनाकारण धर्माधर्मात, जातीजातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, आम्ही महाराष्ट्र म्हणून एकत्र आहोत आणि महाराष्ट्र हिताचेच बोलत राहणार आहोत, असेही श्री. नाईक म्हणाले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

