मुंबईत चिमुरड्यांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
*🛑मुंबईत चिमुरड्यांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मुंबई, दि-३०*:-लहान मुलांची विक्री करणाऱ्या टोळीचा क्राईम ब्रांचने पर्दाफाश केल्याने, एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सात जणांना अटक केली असून, याचा अधिक तपास सुरू आहे.अटक केलेल्या सात जणांमध्ये एका डॉक्टरचाही समावेश आहे. विशेष म्हणजे आरोपी मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये काम करत असल्याची माहिती तापासातून समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वंदना पवार, शितल वारे, स्नेहा सूर्यवंशी, नसीमा खान, लता सुरवाडे, शरद देवर,डॉ. संजय सोपानराव खंदारे अशी आरोपीची नावे आहेत. या सात जणांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून आतापर्यंत १४ लहान बाळांची विक्री झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी अधिक तपास केला असता मुंबई पोलिसांना आपल्या कारवाईत २ बाळांची सुखरुप सुटका करण्यात यश आले.या प्रकरानंतर मुंबईतील काही रुग्णालये ही मुंबई पोलिसांच्या रडारवर आहेत. या प्रकरणातील आरोपी डॉक्टरचे दिवा येथे क्लिनिक आहे. तो मूळचा नांदेडचा रहिवासी आहे. या रॅकेटमध्ये त्याचा सहभाग आढळला आहे. कदाचित या डॉक्टरकडे लहान मुलांचे पालक गेले असावेल तिथे त्यांचा संपर्क’ झाला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला विक्रोळीमधून एका बाळाची विक्री करुन रत्नागिरी येथे देण्यात आले होते. तसेच, तेलंगणामधून या बाळांची डिमांड होती. त्यानुसार या बाळांची विक्री होत होती. तेलंगणा आणि हैदराबादमधून बाळांच्या खरेदीचा प्रस्ताव होता. अटक केलेल्या सर्व आरोपीना ७ दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. विक्री केलेल्या लहान बाळांमध्ये ११ मुले आहेत. तर ३ मुली आहेत. कमीत कमी दिवस ते जास्तीत जास्त ९ महिने असे विक्री केलेल्या बाळांचं वय आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

