कोकणमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

नारायण राणेंना मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद !

*🛑 नारायण राणेंना मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद !*

*🛑 राणे यांच्या ऋणातून उतराई होण्याची ही एक संधी ! : भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सिंधुदुर्गनगरी, दि-३०*:-केंद्रीयमंत्री नारायण राणेंना, जेव्हा नेतृत्वाची संधी मिळाली, तेव्हा जिल्ह्यासाठी, कोकणसाठी, महाराष्ट्रासाठी त्यांनी यशस्वी नेतृत्व केलेय. लघुउद्योग मंत्री म्हणूनं ते आता देशाचे नेतृत्व करत आहेत. केंद्र सरकारमध्ये या भागातील कर्तृत्ववान नेतृत्व म्हणून त्यांना आदराचे व सन्मानाचे स्थान आहे. भाजप महायुतीचे उमेदवार म्हणून ते निवडणूक रिंगणात आहेत. महायुतीतील सर्वच पक्षांनी गावागावात प्रचाराचा धडाका सुरू ठेवला असून मतदारांनी या नेतृत्वाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय त्यामुळे या मतदारसंघातून राणे दीड लाख भताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी व्यक्त केला.गेली ३० ते ३५ वर्षे नारायण राणे यांनी आपली जन्मभूमी व कर्मभूमी समजून जिल्ह्याचे अनेक पदांवर नेतृत्व केले. सक्षम नेतृत्व, कोकणचा बुलंद आवाज म्हणून त्यांनी मंत्री, मुख्यमंत्री व आता केंद्रीयमंत्री या पदावर काम करताना आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला! हा जिल्हा टँकरमुक्त होण्यात आणि पाणीटंचाई दूर करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. उच्च शिक्षणाच्या सोयी-सुविधा याकडेही त्यांनी प्राधान्य दिले. जिल्हयात विमानतळ, महामार्ग, औद्योगिक विकास क्षेत्र यातही त्यांच्याच काळात चालना मिळाली. आरोग्यविषयक सुविधा बळकट व्हावी व जिल्ह्यातच चांगल्या दर्जाची आरोग्य सेवा मिळावी म्हणून पडवे येथे वैद्यकीय महाविद्यालय व हॉस्पिटल सुरू केले. सिंधुदुर्गनगरी येथे आता नव्याने रोजगाराला चालना देणारे केंद्र म सरकारच्या उद्योग विभागाचे २०० कोटी रुपये खर्च व करून प्रौद्योगिक केंद्र सुरू होत आहे. हा सर्व विकास राणेंच्या रुपाने एका कार्यक्षम नेतृत्वामुळे होत आहे. म्हणूनच कोकणच्या विकासाला आणखी गती मिळावी म्हणून लोकसभेत या नेतृत्वाला संधी मिळण्याची आवश्यकता आहे, हा विचार मतदारांनी करावा. त्यांच्या मागे जनतेने शक्ती निर्माण करावी, असे आवाहन सावंत यांनी केले आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९१८ बूथवर भारतीय जनता पक्षासह महायुतीतील सर्व घटक पक्षांचे नेते व कार्यकर्ते सक्रिय काम करीत आहेत. भाजपसह शिंदे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, मनसे, आरपीआय आठवले गट या पक्षांचे कार्यकर्ते व नेते प्रचार कार्यात सक्रिय आहेत. सावंतवाडी, कुडाळ व कणकवली या तिन्ही विधानसभा मतदारसंघात नारायण राणे यांच्या बाजूने उत्साहाचे वातावरण आहे. या भागात त्यांनी केलेल्या कामामुळे त्यांच्या ऋणातून उतराई होण्याची ही संधी आहे, असे मतही काही मतदार व्यक्त करीत आहेत. केंद्रात नारायण राणे व राज्यात सार्वजनिक बांधकाममंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, उद्योगमंत्री उदय सामंत अशा या जिल्ह्यातील नेतृत्वांमुळे व सतेतील संधीमुळे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीला दमदार नेतृत्व मिळाले आहे. अशा दमदार नेतृत्वामुळे कोकणात अनेक विकासकामे आता दिसू लागली आहेत. त्यामुळे विकासासाठी या सर्वच नेतृत्वाची गरज आहे. म्हणूनच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भरघोस मताने निवडून द्या, असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केले आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!