कोकणमहाराष्ट्रराजकीय

रखडलेला मुंबई-गोवा हायवे हे भाजपचे पाप !

*🛑रखडलेला मुंबई-गोवा हायवे हे भाजपचे पाप !*

*🛑पिंपळी नाका येथील मेळाव्यात खासदार विनायक राऊत यांचे टीकास्त्र*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴चिपळूण, दि-३०*:-रखडलेला मुंबई-गोवा हायवे हे भाजपचे पाप आहे. याच राष्ट्रीय महामार्गसाठी विनायक राऊत याने काय प्रयत्न केलेत याची ग्वाही खुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देतील. गडकरी यांनी रस्त्यासाठी निधी मंजूर केला खरा, परंतु या भाजपच्या नेत्यांनी स्वतःच्या कुटुंबियांना ठेके देऊन निकृष्ट दर्जाचे काम केले आणि म्हणून आज त्याचा त्रास अपना सर्वांना होत असल्याचे टीकास्त्र लोकसभेचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांनी शुक्रवारी येथे भाजपवर सोडले.रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रचारार्थ चिपळूण तालुक्यातील पिंपळी नाका येथे आयोजित अलोरे जिल्हा परिषद व टेरव पंचायत समिती गणाच्या मेळाव्यात ते बोलत होते.राऊत पुढे म्हणाले की, मुंबई- गोवा महामार्गचे काम रखडले असले तरी मी यंदा निवडून आलो तर चिपळूणच्या पुलासहित आरवली ते लांजा या रखडलेल्या महामार्गाचे काम प्रधान्याने आणि उत्कृष्ट दर्जाचे करून घेणार असल्याचे सांगितले. रत्नागिरी जिल्ह्यात अदानीच्या इच्छेनुसार प्रिपेड वीज मीटर बसवण्याचा डाव या शिंदे-फडणवीस सरकारने आखला होता. त्याविरोधात हा विनायक राऊत एकटा उभा राहिला. त्याचप्रमाणे मार्च महिन्यात रत्नागिरीसह कोकणातील पाच जिल्ह्यांवर सिडकोचे संकट घोंगावत आहे. परंतु कोणत्याही परिस्थितीत कोकणात सिडको प्राधिकरण येऊ देणार नाही. कारण सिडकोच्या माध्यमातून यांना आपल्या जमिनीवर आरक्षण टाकून त्या उद्योगपतींच्या घशात घालायच्या आहेत व त्याला आम्ही ठामपणे विरोध करणारच असा इशाराही राऊत यांनी दिला.यावेळी शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव, माजी आमदार रमेश कदम, संभाजी ब्रिगेडचे सुधीर भोसले, अनिरुद्ध कांबळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, मनोहर मोहिते, जिल्हाप्रमुख सचिन कदम आदी इंडिया आघाडीचे मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!