‘वंदेभारत’, ‘तेजस’ला पावसाळ्यात ब्रेक ?
*🛑’वंदेभारत’, ‘तेजस’ला पावसाळ्यात ब्रेक ?*
*🛑आरआरसीटीसीच्या संकेतस्थळावर १५ जूननंतर दोन्ही गाड्या रद्दचा संदेश*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴बांदा, दि-२७*:-मध्य व कोकण रेल्वे प्रशासनाच्या अनियोजित कारभारामुळे पावसाळ्यात कोकणात वंदे भारत धावणार की नाही, असा गोंधळ निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून ‘आयआरसीटीसी’च्या संकेतस्थळावर १५ जूननंतरची कोकणातील वंदे भारत, तेजस एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्याचा संदेश दिसत आहे. त्यामुळे पावसाळ्यात या दोन्ही एक्स्प्रेस गाड्या धावणार नाहीत, असे संकेत मिळत आहेत. याबाबत कोकण रेल्वे व मध्य रेल्वेकडून स्पष्टीकरण येणे गरजेचे असून या महत्वाच्या गाड्या धावणार की नाही हे कोकणी जनतेला समजणे गरजेचे आहे. तशा प्रकारची मागणी सुद्धा होत आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवासी सुरक्षेसाठी कोकण रेल्वेवर दरवर्षी १० जून ते ३१ ऑक्टोबरपर्यंत पावसाळी वेळापत्रक लागू केले जाते. मात्र, रेल्वेवरील नियमित रेल्वेगाड्यांचे आरक्षण प्रवासाच्या १२० दिवस आधी सुरू होते. त्यामुळे कोकण रेल्वेवरील पावसाळी वेळापत्रकानुसार होणारे बदलही आरक्षण प्रणालीत तेव्हाच नोंद होणे अपेक्षित आहे. परंतु हे बदल न झाल्याने प्रवाशांना जूनपासून ऑगस्ट महिन्यापर्यंतची तिकिटे आरक्षित करण्यास अडचणीचे ठरत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून १० जूननंतरची तिकिटे काढता येत नसल्याने पावसाळ्यात कोकणातील वंदे भारत, तेजस एक्स्प्रेस धावणार नसल्याची चर्चा सुरू झाली आहे. याबाबत कोकण रेल्वे प्रशासनाशी मोबाईलवरून संपर्क साधण्याचा, तसेच संदेशाद्वारे विचारणा करण्यात आली असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. सद्यस्थितीत रेल्वे प्रशासनाने प्रवाशांमध्ये गाड्याबाबतपडलेल्या प्रश्नांबाबत स्पष्टीकरण देणे गरजेचे आहे. तेजस एक्सप्रेस आणि वंदे भारत या दोन्ही गाड्या धावणार की नाही हे जाहीर करणे गरजेचे आहे. काही महिन्यावर कोकणातील महत्वाचा उत्सव गणेशोत्सव आला असून ‘वंदे भारत’ गाडीचा चाकरमान्यांना कमी वेळात कोकणात येण्यासाठी फायदा होणार आहे. मात्र, तीच गाडी रद्द केली तर यासाठी पर्याय शोधणे प्रवाशांना सोपे होईल. गेल्या दोन महिन्यांपासून पावसाळ्यातील वंदे भारत, तेजस एक्स्प्रेसची तिकिटे आरक्षित करता येत नाही. अशीच परिस्थिती पुढील १० दिवस राहिली तर, कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास खडतर होईल. पुढील १० दिवसांत गणेशोत्सव काळातले आरक्षण सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर मध्य आणि कोकण रेल्वेने लवकरात लवकर पावसाळी वेळापत्रकाची नोंद प्रवासी आरक्षण प्रणालीत करून सर्व रेल्वेगाड्यांचे आरक्षण सुरू करण्याची मागणी कोकणी जनतेकडून होत आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

