आपत्ती व्यवस्थापन कायदा भंग केल्याप्रकरणी पार्सेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
महालक्ष्मी अंध-अपंग संघटना बसली बेमुदत उपोषणाला.,.
ब्युरो न्यूज – कोकण लाईव्ह ब्रेकिंग
सावंतवाडी- भारतीय संविधान साथ प्रतिबंधक कायदा आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा२९८८ चा भंग करून नकुल पार्सेकर यांनी आपल्या मुलीला व जावई याला घरामध्ये क्वारंटाईन करून ठेवल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी महालक्ष्मी अंध अपंग निराधार सामाजिक संघटनेच्या वतीने येथील बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिराच्या प्रांगणात बेमुदत उपोषणाला सुरुवात करण्यात आले आहे.
बाबासाहेब आंबेडकर यांनी जी घटना लिहिली त्या घटनेत सर्वांना समान अधिकार दिले आहेत, कायद्यापुढे कोण मोठा व नाही आम्ही अंध अपंग निराधार करना काळात घरात राहिलो मात्र काही मंडळी अशा प्रकारचे कृत्य करून समाजात उजळ माथ्याने फिरत होती त्यांना कायदा सर्वांसाठी समान आहे हे दाखवण्यासाठी हे उपोषण करावे लागत आहे असे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे आपला गुन्हा लपविण्यासाठी कोणी कुठे आणि कोणता प्रकार करून समाजात चुकीचे पायंडे पाडत असतील तर अशा लोकांना कायदा आणि संविधान यापेक्षा कोणी मोठा नाही हे दाखवण्याची नैतिक जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यावर सोपवली असताना सरकारी कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले जात नसल्याने अशा प्रकारची उपषणे करावी लागत असल्याचे म्हटले आहे जो पर्यंत संबंधितांवर गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा इशाराही या संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.