युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार असेल तर नाणारसारखे रोजगार निर्मितीचे प्रकल्प कोकणात यावेत; साहिल आरेकर
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : अद्वैत अभ्यंकर
🎴राजापूर,दि.३१: कोकणात विद्यार्थी शैक्षणीक कर्ज घेऊन शिक्षण पूर्ण करतात व त्यानंतर नोकरीचा शोध घेतात. परंतु स्थानिक पातळीवर नोकरी उपलब्ध झाली नाही की मग मुंबई-पुणे अश्या मोठ्या शहरामध्ये जाऊन नोकरी करतात. कोकणामध्ये मोठे उद्योग नाहीत. मुंबईला आणि पुण्याला जाऊन नोकरी करावी लागते. पण भविष्यात हे चित्र कुठेतरी बदलले पाहीजे आणि त्यासाठी थोडं सर्वांनी एकमताने विचार करणे गरजेचे आहे. जर अश्या प्रकारचे उद्योग कोकणात आले तर निश्चितच विद्यार्थ्यांना, अनेक हातांना रोजगार मिळेल. त्यामुळे नाणार सारखे प्रकल्प येण्यासाठी सर्वपक्षीय लोकांनी एकत्र येणे गरजेचे आहे, असे मत रत्नागिरी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष साहिल आरेकर यांनी मांडले आहे. तसेच महाविकास आघाडीतील मित्र पक्षाचे आमदार राजन साळवी यांनी याविषयी पुढाकार घेतला हे निश्चित स्वागतार्ह असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
*_💥आरोंदा पंचक्रोशीतील लोकांसाठी सुविधा..💥_*
*🔥 श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटर 🔥*
*_🔬सर्व प्रकारच्या खात्रीशीर टेस्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण.._*
💫सन 1994 पासूनची विश्वसनीय परंपरा..
💫शिरोडानंतर आरोंदा येथे दुसरी शाखा..
💫आरोंदा, गुळदुवे, नाणोस, तळवणे, भटपावणी, मळेवाड, केरी व पालये सह लगतच्या गावांतील नागरीकांची उत्तम सोय..
💫पूर्णपणे कम्प्युटराईज लॅबोरेटरी..
💫कोणत्याही आजारावर खात्रीशीर टेस्टिंग रिपोर्ट मिळण्याचा पर्याय उपलब्ध..
*_🙋🏼♂️आमचा पत्ता ⬇️_*
*🏬श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटरी*
वक्रतुंड ट्रेडर्स, अपना बाजार व मुकुंद बाजार च्या समोर, आरोंदा, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
*📱9422058778*
*📱7066290913*
*📱9420647895*
*_🚫टीप : लॅब दर सोमवारी बंद राहील.._*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

