कास-शेर्ले सिमेवर माळरानावर आग लागण्याच्या वारंवार घटना.
काल सायंकाळी आग लागुन सुमारे 10 ते 15 एकर क्षेत्र आगीच्या भक्षस्थानी.
बांदा:प्रतिनिधी:शैलेश गवस
कास – शेर्ले सिमेवर वारंवार आग लागण्याच्या घटना घडत आहेत.या आठवड्यात तिनवेळा आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत.मोठ्याप्रमाणात आग लागुन मोठे क्षेत्र आगीच्या भक्षस्थानी पडले मात्र कोणत्याही प्रकारची लागवड नसल्याने कोणतीही नूकसानी झालेली नाही.काल सायंकाळी उशीरा आग लाल्याने रात्री 9 वाजेपर्यत आगीचा थरार सुरू होता.मात्र या क्षेत्रामध्ये कोणत्याही प्रकारची लागवड नसल्याने कोणतीही नूकसानी झालेली नाही.मात्र अद्यापपर्यत आग लागण्याचे कारण समजू शकले नाही.

