Uncategorized

गुढीपाडवानिमित्त राजा शिवाजी चौक मित्रमंडळाच्या वतीने रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन

भव्य ग्रुप रेकॉर्ड डान्स स्पर्धा आयोजित राजा शिवाजी चौक मित्र मंडळ सावंतवाडी यांच्यावतीने मराठी नववर्ष स्वागताच्या निमित्ताने दिनांक 9 एप्रिल 2024 रोजी गुढीपाडव्यानिमित्त श्री सत्यनारायणाची महापूजा असते या कार्यक्रमाच्या निमित्ताने भव्य ग्रुप रेकॉर्डिंग स्पर्धा ठेवण्यात आली आहे. ही स्पर्धा दोन गटांमध्ये होणार आहे एक बालगट आणि दुसरा खुला गट खुल्या गटासाठी प्रथम पारितोषिक 8000 हजार रुपये, द्वितीय पारितोषिक 5000 रुपये, तृतीय पारितोषिक 3000 रुपये, तर बालगटासाठी प्रथम पारितोषिक 5000 हजार रुपये,द्वितीय 3000 हजार तृतीय 2000 हजार असे स्पर्धेचे स्वरूप असणार आहे. ही स्पर्धा राजा शिवाजी चौक मित्रमंडळाच्या स्टेज वरती घेणार आहे या स्पर्धेमध्ये परीक्षकांचे निर्णय अंतिम राहतील. ही स्पर्धा ठीक साडेसहा वाजता सुरू करण्यात येणार आहे याची प्रत्येक स्पर्धकांनी नोंद 8 एप्रिल संध्याकाळपर्यंत मंडळांच्या कार्यकर्त्यांकडे द्यायचे आहे. स्पर्धकांनी वेळेत उपस्थित राहावे स्पर्धकांनी आपली नाव नोंदणी करिता दीपक सावंत 724920 2691 दिलीप पवार 9405163107 व रवी जाधव 9405264027 या नंबर वरती संपर्क साधायचा आहे. स्पर्धे दिवशी आयत्यावेळी आलेल्या स्पर्धकांना स्पर्धेमध्ये भाग घेता येणार नाही. स्पर्धकांनी आपली नोंदणी आगाऊ करावी. त्याच दिवशी स्पर्धा संपल्यानंतर बक्षीस वितरण होणार आहे. असे मंडळाचे अध्यक्ष बंटी माठेकर, उपाध्यक्ष बंड्या तोरस्कर, उपाध्यक्ष दिलीप पवार, उपाध्यक्ष अरुण घाडी, सचिव दीपक सावंत, सचिव महादेव राऊळ जनसंपर्कप्रमुख रवी जाधव यांच्या वतीने आवाहन करण्यात आलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!