सामाजिक

केंद्रीयमंत्री नारायण राणे आज सायंकाळी येणार सावंतवाडीत

 

सावंतवाडी, दि ०४- केंद्रीय मंत्री भाजपचे नेते कोकणचा बुलंद आवाज नारायण राणे आज संध्याकाळी ठीक पाच वाजता सावंतवाडी येथील प्रहार कार्यालयात कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती सावंतवाडी चे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी दिली .

काल सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारायण राणे यांचे जंगी स्वागत करण्यात आले, कुडाळ मध्ये झालेल्या मेळाव्यात नारायण राणे यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला, त्यानंतर आज ते सावंतवाडी येथील प्रहार कार्यालया मध्ये सायंकाळी ठीक पाच वाजता उपस्थित राहणार असल्याची माहिती संजू परब यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!