केसरकरांच्या थंड दहशतीचे पितळ उघडे !
*🛑 केसरकरांच्या थंड दहशतीचे पितळ उघडे !*
*🛑 रुपेश राऊळ यांची टीका : शस्त्राची गरज का, हे जनतेला सांगावे!*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-०३*:-शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे आत्मसंरक्षण बंदूक असल्याचे प्रशासनाने उघड केल्याने केसरकर यांच्या थंड दहशतीचे पितळ उघडे पडले आहे, असे ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांनी सावंतवाडी तालुक्यातील १३ शस्त्र परवानाधारकांना बंदुका (शस्त्र) पोलीस ठाण्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जमा करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामध्ये दीपक केसरकर यांचे नाव असल्याने प्रशासनाने बुरखा पांघरून दहशतीवर बोलणाऱ्या केसरकर यांचा बुरखा टराटरा फाडला आहे, असे राऊळ यांनी म्हटले आहे. केसरकर यांनी स्वतःकडे शस्त्र असल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा दहशतवादमुक्त म्हणून जाहीर केला का? अन्यथा जर खरोखरच जिल्हा दहशतमुक्त आहे तर तुम्हाला शस्त्राची गरज का लागते? ते पण केसरकर यांनी जनतेला सांगणे गरजेचे आहे. दहशत-दहशत म्हणून दोन विधानसभा निवडणुका लढवणारे केसरकर त्याच नेत्यासोबत हातमिळवणी करून मांडीला मांडी लावून बसत आहेत. जनकल्याणाच्या योजना राबविल्या नाहीत. रोजगारही उपलब्ध करून दिला नाही. त्यामुळे सोज्वळ चेहरा घेऊन वावरणाऱ्या केसरकर यांच्याकडील शस्त्र पोलीस ठाण्यात जमा करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश पारित केले आहेत. त्यामुळे केसरकर यांचे आणखी एक पितळ उघडे पडले आहे, असे राऊळ यांनी सांगितले. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ, सिंधुदुर्ग जिल्ह्यात केसरकर यांच्या भूलथापांना बळी पडणारे लोक, तरुण आता खरा चेहरा ओळखून आहेत. त्यामुळे केसरकर मतदारसंघातही फिरत नाहीत. फक्त पत्रकार परिषद घेऊन अवसान निर्माण करत आहेत, असे राऊळ यांनी सांगितले. ते म्हणाले, बंदूक, शस्त्र पोलीस ठाण्यात जमा करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश पारित केले आहेत. त्यामध्ये दिलेल्या कारणांमुळे केसरकर सपशेल उघडे पडले आहेत. हत्ती, गवा रेडा, वन्यप्राणी लोकवस्तीमध्ये घुसून शेती, बागायतीचे प्रचंड नुकसान करत आहेत. त्या शेतकऱ्यांना शस्त्र परवाना मिळवताना नाकेनऊ येतात. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकरी, बागायतदार यांना शस्त्र परवाना नूतनीकरण करून देण्यासाठी मोठा मानसिक त्रास दिला तेव्हा केसरकर गप्प बसले. मात्र, स्वतःसाठी बंदूक शस्त्र परवाना मिळवला यावरून केसरकर यांचा दुटप्पीपणा उघड झाला आहे, असे राऊळ यांनी सांगितले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

