कणकवलीकोकणमहाराष्ट्रसामाजिक

अतिक्रमण करून घर बांधल्याबाबत गुन्हा

*🛑अतिक्रमण करून घर बांधल्याबाबत गुन्हा*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली, दि-०३*:-आपल्या मालकीच्या जागेमध्ये अतिक्रमण करून घर बांधल्याबाबत तसेच सदर जागेस असलेले लाकडी बांबूचे कुंपण तोडून नुकसान केल्याची फिर्याद हळवल-मधलीवाडी येथील विद्याधर रामचंद्र राणे (६५, सध्या रा. अंधेरी पश्चिम-मुंबई) यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार विद्याधर यांच्या चुलत भावाचे मुलगे प्रसाद पंढरीनाथ राणे, प्रताप पंढरीनाथ राणे, गणेश पंढरीनाथ राणे (तिन्ही रा. हळवल) यांच्याविरुद्ध कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीनुसार, विद्याधर यांची परबवाडी येथेच वडिलोपार्जित जमीन आहे. या जमिनीमध्ये त्यांचा चुलत भाऊ पंढरीनाथ राणे याने त्यावेळची सामाईक जमीन असताना १९९५ मध्ये घराचे बांधकाम केले होते. दरम्यान, १३ जानेवारीला गावी आलेले विद्याधर आपल्या जमिनीमध्ये गेले असता तेथे पंढरीनाथ याचे मुलगे प्रसाद, प्रताप, गणेश यांनी मिळून परस्पर अतिक्रमण करून १९९५ साली बांधलेले घर पूर्णपणे पाडून तेथे नवीन घराचे बांधकाम केल्याचे दिसून आले. तसेच बांबूचे कुंपण तोडून नुकसान केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!