कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडी

सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नारायण राणेच भाजपचे उमेदवार?

*🛑सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नारायण राणेच भाजपचे उमेदवार?*

*🛑अनेकांचे मनसुबे मिळणार धुळीस,कोकण लाईव्ह ब्रेकिंग चे वृत्त ठरणार खरे*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-२८*:-सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनाच उमेदवारी मिळणार असल्याचे निश्चित झाले असून कोकणातील एक वजनदार नेता व मतदार संघाचा खडाणखडा अभ्यास असलेला नेता यादृष्टीने नारायण राणे यांना ही उमेदवारी देण्यात आली असून विनायक राऊत यांचे वर्चस्व मोडीत काढून नारायण राणे विजयी होतील असा विश्वास पक्षश्रेष्ठींना असल्याने राणे यांचे नाव निश्चित करण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाला एक उच्च विचारांची परंपरा राहिलेली आहे,हा मतदारसंघ विचारवंतांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो, त्यामुळे या मतदारसंघात कोणीही उठाव व गुडघ्याला बाशिंग बांधून उमेदवार म्हणून आपले नाव घोषित करून पुढे यावं एवढा हा मतदारसंघ सोपा नाही, येथील जनता ही दुध खुळी नाही त्यामुळे गेली अनेक वर्ष मुख्यमंत्रीपदापासून केंद्रीय मंत्री पदापर्यंत उच्च पदस्थ व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध असलेले, कोकणचे ढाण्या वाघ म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो असे नारायण राणे यांना या लोकसभा मतदारसंघात भाजपने उतरण्याचे निश्चित केले आहे, नारायण राणे यांना लोकसभा लढविण्याची इच्छा नव्हती मात्र पक्ष श्रेष्ठ यांच्या आग्रहाखातर त्यांनी ही निवडणूक लढविण्यास हिरवा कंदील दिल्याचे समजते, त्यामुळे भाजपच्या पक्ष श्रेंष्ठीनी नारायण राणे यांचे नाव लोकसभेसाठी निश्चित केले आहे.
याचाच अर्थ सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघ भाजप कमळ या निशाणीवरच लढणार आहे, त्यामुळे कोकण लाईव्ह न्यूज चॅनेल ने यापूर्वी जे लिहीले होते त्यावर आता शिक्कामोर्तब होणार आहे,
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणतेही कार्य कर्तृत्व नसताना किंवा एका विधानसभा मतदारसंघापूरते राजकारणातून आपले नाव आहे म्हणून कोण गुडघ्याला बाशिंग बांधून लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करत असेल तर त्याचा तो प्रयत्न म्हणजे निव्वळ लोकांची करमणूक आहे ,कारण तसे बघायला गेले तर हा मतदारसंघ विद्यमान खासदार विनायक राऊत यांचा आहे व ते उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये आहे, त्यामुळे या मतदारसंघावर शिंदेंची शिवसेना नैसर्गिक दावा करू शकत नाही म्हणूनच हा मतदारसंघ भाजपने आपल्या ताब्यात घेण्याचे ठरविले आहे व आपले उमेदवार म्हणून नारायण राणे यांचे नाव निश्चित केले आहे.त्यामुळे सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आता खरी रंगतदार होणार आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!