आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑सावंतवाडीतील करियर कार्यशाळेला प्रतिसाद

🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL

✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴ओटवणे, दि-२७:- महिला व बालविकास विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व शिक्षण विभाग पंचायत समिती सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी तालुक्यातील नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आर.पी. डी. हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे करियर समुपदेशन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना उपलब्ध विविध शिक्षणाच्या वाटा, विविध स्पर्धा परीक्षा त्यासाठी लागणारी तयारी या संबंधी मार्गदर्शन करण्यात आले. यात ग्रामीण भागात शैक्षणिक व आर्थिक अडचणींवर मात करुन जिद्द व मेहनतीने पहिल्याच प्रयत्नात राज्य सेवा आयोग परीक्षेत यशस्वी झालेले प्रेरणादायी व्यक्तीमत्व व सद्या सावंतवाडी कारागृहाचे कर्तव्यदक्ष उपअधीक्षक संदीप एकशिंगे यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यातील क्लृप्त्या सांगितल्या. कोल्हापूर, गडहिंग्लजसह सिंधुदुर्गातील ग्रामीण भागातील मुलांना इंजिनिअर व डॉक्टर होण्याची स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी उत्कृष्ट मार्गदर्शन करणारे यशस्वी गुरु, सुपर एकॅडमीचे संचालक अमोल पाटील यांनी जेईई (JEE), नीट (NEET) व सी. ई. टी. (CET) यासंबंधी मार्गदर्शन केले. पंचायत समिती सावंतवाडीच्या गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पांडुरंग काकतकर यांनी केले. आभार प्रसाद सांगेलकर यांनी मांडले. आरपीडीचे प्राचार्य धोंड, प्रा. विलास पोळ, विठ्ठल सावंत आदी उपस्थित होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!