आरोग्यकोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

उसप येथे गांधील माश्यांच्या हल्ल्यात चौदाजण जखमी

*🛑उसप येथे गांधील माश्यांच्या हल्ल्यात चौदाजण जखमी*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴साटेली-भेडशी, दि-२६*:-उसप येथील रविवारी दुपारी डोंगरात होळी आणण्यासाठी गेलेल्या काही नागरिकांवर गांधील माश्यांनी. हल्ला केला. या हल्ल्यात जवळपास चौदाजण गंभीर जखमी झाले. या जखमींना उपचारासाठी तात्काळ साटेली-भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते.याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी दुपारी उसप येथील बरेच नागरिक होळी आणण्यासाठी गावातीलच डोंगरात गेले असता होळी तोडत असताना तिथे असणाऱ्या गांधील माश्यांचा अंदाज आला नाही. तोच या गांधील माश्या अचानकपणे खवळल्या आणि तिथे असणाऱ्या बऱ्याच जणांवर माश्यांनी हल्ला केला. यात जवळपास चौदाजण गंभीर जखमी झाले. त्या सर्वांना उपचारासाठी तात्काळ साटेली-भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. जखमीनध्ये कृष्णा लाडू गवस (४७), प्रथमेश प्रमाकर नाईक (२४), ज्ञानेश्वर भिवा रेडकर (४१), एकनाथ चंद्रकांत गवस (५०), ज्ञानेश्वर भिवा रेडकर (४७), संतोष विठ्ठल जाधव (३४). दत्ताराम गवस (२८), दिलीप कृष्णा गवस (१४), राजेंद्र अंकुश गवस (५४), गौरव लक्ष्मण रेडकर (१८), कृष्णा चंद्रकांत गवस (५०), प्रशांत प्रकाश रेडकर (३०). लक्ष्मण भिकाजी रेडकर (५२), जनार्दन बाबाजी देसाई (३१) यांचा समावेश आहे. उपचारांनंतर रविवारी उशिरा सायंकाळी घरी पाठवण्यात आले तर यातील एका गंभीर जखमीला पुढील उपचारासाठी दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्र साटेली- भेडशी येथून मिळाली.
*सविस्तर बातमीसाठखालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!