साहिल प्रकाशन गोवा यांच्या वतीने आयोजित ‘ भानशून्य ‘ काव्यसंग्रहातील कविता सादरीकरण स्पर्धेत महाराष्ट्र व गोवा राज्यातून खुला गट सौ.रीना मोरजकर प्रथम तर लहान गटात नैतिक मोरजकर द्वितीय
*🛑साहिल प्रकाशन गोवा यांच्या वतीने आयोजित ‘ भानशून्य ‘ काव्यसंग्रहातील कविता सादरीकरण स्पर्धेत महाराष्ट्र व गोवा राज्यातून खुला गट सौ.रीना मोरजकर प्रथम तर लहान गटात नैतिक मोरजकर द्वितीय*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :शैलेश गवस*
*🎴बांदा, दि-२५* :-साहिल प्रकाशन गोवा यांच्यावतीने पणजी येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रमोद भिसो कारापूरकर यांच्या ‘भानशून्य’ काव्यसंग्रहातील कविता सादरीकरण स्पर्धेत महाराष्ट्र व गोवा राज्यातून खुल्या गटात शिक्षिका सौ.रीना निलेश मोरजकर (दिव्य ज्योती इंग्लिश मिडीयम स्कुल, बांदा) हिने प्रथम तर लहान गटात नैतिक निलेश मोरजकर (खेमराज हायस्कुल, बांदा) याने द्वितीय क्रमांक मिळविला.
आतापर्यंत विविध स्पर्धामध्ये मोरजकर माय-लेकाने अनेक पारितोषिके मिळविली असून त्यांच्या या यशाचे कौतुक होत आहे. गोव्यातील प्रतिथयश कवी प्रमोद कारापूरकर यांच्या भानशून्य या काव्यासंग्रहावर सुरुवातीला ऑनलाईन स्पर्धा घेण्यात आली होती. यामध्ये महाराष्ट्र व गोव्यातील १०० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.त्यानुन ३० स्पर्धकांची सादरीकरणासाठी निवड करण्यात आली होती.पणजी गोवा येथील गोमंतक साहित्य सेवा मंडळाच्या सभागृहात ही स्पर्धा संपन्न झाली.स्पर्धेचे परीक्षण स्वतः कवी प्रमोद कारापूरकर,संगीत शिक्षक निलेश शिंदे यांनी केले.खुल्या गटात सौ.मोरजकर यांनी ‘काव-काव’ ही कविता सादर केली होती.तर नैतिक मोरजकर याने ‘गांधीजींची तीन माकडे’ ही कविता सादर केली.यामध्ये सौ.मोरजकर यांनी खुल्या गटात प्रथम तर नैतिक मोरजकर याने बाल गटात द्वितीय क्रमांक मिळविला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षता किनळेकर यांनी केले.साहिल प्रकाशनचे प्रकाशक निलेश बुगडे यांनी आभार मानले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

