आणखीकोकणमहाराष्ट्ररत्नागिरीसामाजिक

🛑 आदर्श आचारसंहितेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी ; जिल्हाध्यक्ष योगेश पेढांबकर

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴चिपळूण, दि-२३:- लवकरच भारताच्या लोकसभेचे निवडणुका लागणार व होणार आहेत. या निवडणुकांसाठी आपण आदर्श आचारसंहिता ची अंमलबजावणी करणे करता अनेक पत्र व्यवहार राज्यांना केलेले होते व आहेत. त्यातील काही महत्वाचे मुद्दे अनुक्रमे –

त्यात ज्या अधिकाऱ्यांचे एका जिल्ह्यात तीन वर्षापेक्षा जास्त किंवा एका ठिकाणी तीन वर्षापेक्षा जास्त कर्तव्य झालेले आहे. त्यांच्या तात्काळ बदल्या करण्याबाबतचे आदेश होते. परंतु,आजही महाराष्ट्रात असे अनेक अधिकारी आहेत की,जे आजही स्व- जिल्ह्यात आणि तीन वर्षापेक्षा जास्त कर्तव्य झालेल्या जिल्ह्यात,शासनाने प्रशासनाने ठेवलेले आहेत. त्यांच्या बदल्या केलेल्या नाहीत.

त्याचप्रमाणे स्व- जिल्ह्यातील स्व- तालुक्यातील आणि कर्तव्यात असलेल्या ठिकाणात तीन-तीन वर्षे झाले तरी देखील अनेक अधिकारी हे तेथेच आहेत. त्यांना सेक्टर ऑफिसर म्हणून नियुक्त केले जाऊ नये; कारण त्यांचा डायरेक्ट हस्तक्षेप हा प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये होत असतो व आहे. त्यामुळे अशा कोणत्या अधिकाऱ्यांना सेक्टर ऑफिसर म्हणून नेमू नये. त्यांची जिल्हा बाहेर बदली करण्यात यावी

आपण दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे बदल्या केल्या गेल्या नाहीत, राजकीय सोयीने बदल्या केल्या आहेत, त्या सर्व बदल्या आपल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे व्हाव्यात.

तसेच आपल्या आदेशाप्रमाणे प्रत्येक शासकीय कार्यालयात शासनाचे कोणतेही योजनेवरील राजकीय लोकांचे फोटो तसेच कार्यालयातील राजकीय लोकांचे फोटो हे तात्काळ काढण्याचे आदेश झाले असताना देखील महाराष्ट्रात तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी आजही राजकीय लोकांचे फोटो फ्रेम आणि बोर्ड हे लावलेले आहेत. व ते काढले गेले नाहीत. तरी संबंधित अधिकाऱ्यांचे विरुद्ध तात्काळ कारवाई करण्यात यावी.असे आशयाचे निवेदन नुकतेच जिल्हा निवडणूक अधिकारी, तथा अप्पर जिल्हा अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी यांना पत्र,ई-मेलद्वारे सामाजिक कार्यकर्ते माहिती अधिकार कार्यकर्ता,महा.राज्य रत्नागिरी जिल्हाध्यक्ष श्री.योगेश पेढांबकर यांनी केले आहे.याबाबत तातडीने कार्यवाही करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!