कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

बांद्यात अंगणवाडी आवारात बाटल्यांचा खच

*🛑बांद्यात अंगणवाडी आवारात बाटल्यांचा खच*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴बांदा, दि-२२*:-बांदा-देऊळवाडी येथील अंगणवाडीच्या आवारात साफसफाई नसल्याने तसेच मद्याच्या बाटल्यांचा खच असल्याने पालकांनी नाराजी व्यक्त केली. येथील गुरुदत्त कल्याणकर यांनी ही गंभीर बाब बांदा सरपंच प्रियांका नाईक यांच्या निदर्शनास आणून देत तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.येथील अंगणवाडीत १० हून अधिक मुले शिक्षण घेत आहेत. मात्र, अंगणवाडीच्या आवारात कचऱ्याचे साम्राज्य पसरले होते. याबाबत जागरुक पालकांनी याची कल्पना गुरुदत्त कल्याणकर यांना दिली. त्यांनी याची दखल घेत तात्काळ याची माहिती बांदा सरपंच प्रियांका नाईक यांना दिली. सरपंच नाईक यांनी ग्रामपंचायत सदस्य आबा धारगळकर, रुपाली शिरसाट, तनुजा वराडकर यांच्यासह याठिकाणी येत पाहणी केली. त्यावेळी येथील परिस्थिती पाहून सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले. याठिकाणी रात्रीच्यावेळी पार्ष्या होत असल्याने दारुच्या बाटल्यांचा खच पडला आहे. परिसरात साफसफाई नसल्याने झाडाझुडपाची वाढ झाली होती. सरपंच नाईक यांनी सफाई कर्मचाऱ्यांना सूचना देत साफसफाई करून दिली. रात्रीच्या पार्ध्या रोखण्यासाठी समोरील पथदीप सुरू करण्याची मागामी पाताकांनी केली. यावेळी तात्काळ पथदीप तुतुक्क करण्याचे आश्वासन सरपंच नाईक यांनी दिले. रात्रीचे प्रकार रोखण्यासाठी बांदा पोलीस निरीक्षक विकास बडवे यांना पोलीस कर्मचाऱ्यांची गस्त घालण्याची मागणी सरपंच नाईक यांनी केली. अंगणवाडीच्या पाणीपुरवठा व स्वच्छतागृहच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन सरपंच नाईक यांनी यावेळी दिले. यावेळी मनसे तालुकाप्रमुख मिलिंद सावंत, अंगणवाडी सेविका रतन सावंत, मदतनीस आरोही कासकर, जगन्नाथ सातोसकर, चंद्रकांत कदम, जहूर शेख, राघवेंद्र कासकर उपस्थित होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!