इन्सुली तपासणी नाक्यावर कडेकोट तपासणी
*🛑इन्सुली तपासणी नाक्यावर कडेकोट तपासणी*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴बांदा, दि-२१*:-लोकसभा निवडणूक आचारसंहिता जिल्ह्यात लागू झाल्यानंतर प्रशासनाकडून मुंबई-गोवा महामार्गावरील इन्सुली तपासणी नाका येथे कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यामध्ये महसूल, पोलीस, राज्य उत्पादन शुल्क, जीएसटी असे सर्व विभागातील कर्मचारी बंदोबस्तात असून सावंतवाडी तालुक्यात कोणताही निवडणूक काळात अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. या कडक बंदोबस्तामुळे जिल्ह्यात होणाऱ्या अवैध वाहतुकीला आळा बसणार आहे. शिमगोत्सव असून लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता अलिकडेच लागू झाली आहे. यामुळे दारू वाहतूक तसेच अन्य अवैध वाहतूक रोखण्यासाठी तसेच शांततेचा भंग होऊ नये, यासाठी अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे. गोव्यातून सिंधुदुर्गमध्ये येणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जात आहे. मालवाहतूक करणाऱ्या वाहनांचीसुद्धा कसून तपासणी होत असून त्यांच्याकडे जीएसटीचे बिल आहे की नाही याची तपासणी केली जाते. आचारसंहिता संपेपर्यंत ही तपासणी सुरू राहणार आहे. बांदा पोलिसांचा इन्सुली तपासणी नाका हा नेहमीच वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असतो. मात्र, आता संयुक्त तपासणी पथक असल्याने कडक कारवाई करण्यात येणार अशी चर्चा सुरू आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

